मध्यप्रदेशातील जोडप्याकडुन देशी बनावटीच्या २ पिस्टल व २३ काडतुस केले जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

देशी बनावटीची पिस्टल व काडतुसे जवळ बाळगणाऱ्या जोडप्यास स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,त्यांच्याकडुन
पिस्टल-02, काडतुसे-23, मोसा- 01, असा एकूण – 1,73,000/- रु. चा मुद्देमाल केला जप्त…..

जळगाव(जामोद)बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की.सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 नि:पक्ष आणि भयरहीत वातावरणात पार पडाव्या, यासाठी बुलढाणा जिल्हा पोलिस दलाकडून खबरदारीच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सदर अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यप्रदेश सीमेला लागून
असलेल्या पोलिस स्टेशन सोनाळा, तामगांव, जळगांव जामोद हद्दीमध्ये देशी बनावटीचे अग्नीशस्त्र ( पिस्टल), काडतुसे व
ईतर हत्यारांची तस्करी, खरेदी-विक्री तसेच असे घातक हत्यारे जवळ बाळगणाऱ्या ईसमांचा शोध घेवून, त्यांना मुद्देमालासह
पकडून, त्याचेवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात,बी. बी. महामुनी स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांना आदेशीत केले होते.





सदर संबंधाने पोलिस निरीक्षक अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी, स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदारांची विवीध पथके तयार करुन, त्यांना अवैध
देशी पिस्टले, काडतूस बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवून, त्यांचेवर कारवाई करणेबाबत सुचित केले होते.
त्यानुसार, दि.23/04/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय खबर मिळाली की, मध्यप्रदेश राज्यातील
एक जोडपे जळगांव जामोद परिसरामध्ये फिरत असून, त्यांचेकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूसे आहेत. वरुन
स्था.गु.शा.चे पथकाने जळगांव जामोद हद्दीतील निमखेडी फाटा येथे सापळा रचून,1) अशोकसिंग नंदासिंग पटवा वय 50 वर्षे, रा. पाचोरी ता. खकनार जि. बुरहानपुर (म. प्र.) व एक महिला आरोपी वय 40 वर्षे.यांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंगझडतीत 1) देशी बनावटीचे 02 नग अग्नीशस्त्र ( पिस्टल) मॅग्झीनसह किं. प्रत्येकी 40,000/-रुपये प्रमाणे 80,000/-रुपये 2 ) 23 नग जिवंत काडतूस किं.23,000/- रुपये, 3) एक मोटार सायकल किं. 70,000/- रुपये असा एकूण- 1,73,000/-रुपयांचा मुद्देमाल.जप्त करण्यात आला असुन



सदर प्रकरणी पो.स्टे. जळगांव जामोद येथे कलम 3/25 अग्नी शस्त्र कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.नमुद आरोपी यांचे कडून जप्त केलेली मोटार सायकल ही पो.स्टे. दारकापूरी जि. इंदोर (म.प्र.) येथील गुरनं. 772/2022 कलम 379 भादंवि या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे दिसून आले. सदर बाबत संबंधीत पो.स्टे. शी संपर्क करुन पुढील कारवाई करण्यात येत आहे.‏
नमुद गुन्ह्यामध्ये सदर देशी पिस्टल आणि काडतूसे खरेदी करण्यासाठी कोणी येणार होते काय? याचा तपास करण्यात येत
असून, त्या करीता पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी यांचे नेतृत्वामध्ये स्था.गु.शा.चे विशेष पथक तयार करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. जळगांव जा. हे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक सुनिल कडासने,अपर पोलिस अधीक्षक,खामगाव अशोक थोरात,अपर पोलिस अधिक्षक ,बुलढाणा. बी बी महामुनी,उपविभागिय पोलिस अधिकारी ,मलकापुर डी. एस. गवळी यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली,
पोनि. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी, सपोनि. आशिष चेचरे, पोहवा. दिपक लेकुरवाळे, ऐजाज खान, नापोशि. गणेश पाटील,
युवराज राठोड, गजानन गोरले, मपोशि आशा मोरे सर्व नेमणूक- स्था.गु.शा. बुलढाणा यांचे पथकाने पार पाडली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!