अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अट्टल चोरटा बुलढाणा गुन्हे शाखेच्या ताब्यात…

बुलढाणा (प्रतिनिधी) – मलकापूर शहरातील अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपास, मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर शिताफीने अटक करून गुन्ह्यांची उकल करून अटक आरोपी व्यतिरीक्त आणखी एका आरोपीस निष्पन्न केले पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपी,मुद्देमालाचा शोध घेत आहेत.





मलकापूर शहर परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलिस अधिक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी नमुद गुन्ह्याची उकल करुन, गुन्ह्यातील आरोपींची शोध घेवून, गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत अशोक लांडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोनि.अशोक लांडे स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथक तयार करुन, गुन्ह्यांचा समांतर तपास करुन, नमुद गुन्ह्याची यशस्वी उकल करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध आणि गेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना केल्या. सदर प्रकरणी, (1) पो.स्टे. मलकापूर शहर अप.क्र 41/2024 कलम 392, 34 भा.दं.वि. गुन्हा दाखल होता.



या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सौ. ऋऋतुजा श्रेयस व्यवहारे रा.देशपांडे गल्ली, मलकापूर यांनी पो.स्टे. मलकापूर शहर येथे रिपोर्ट दिला की, (दि.29जानेवारी) रोजी मलकापूर टाऊन येथे स्कुटीने जात असतांना, त्यांचे पाठीमागून दोन इसम मोटार सायकलने येवून, फिर्यादी यांचे गळ्यातील सोन्याची पोथ/मंगळसुत्र वजन 40 ग्रॅम किं.1,00,000/-रुपये असे जबरीने हिसकावून चोरुन घेवून, मोटार सायकलने घटनास्थळावरुन पळून गेले. सदर प्रकरणी पो.स्टे. मलकापूर शहर अप.क्र 41/2024 कलम 392, 34 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा तांत्रीक तपास आणि गोपनीय माहितीनुसार, सदर गुन्ह्यात जळगांव खांदेश जिल्ह्यातून आरोपी प्रसाद ऊर्फ परेश संजय महाजन (वय 27 वर्षे) रा.ता.जि.जळगाव (खां.) या आरोपीला (दि.7) रोजी अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यामध्ये अटक आरोपी व्यतिरीक्त आणखी एक आरोपी निष्पन्न आहे. पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरारी आरोपी मुद्देमालाचा शोध घेत आहेत. अटक आरोपी यास पो.स्टे. मलकापूर शहर यांच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. मलकापूर शहर यांचे कडून करण्यात येत आहे.



वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन व कामगिरी पथक पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधिक्षक. अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी गुन्ह्याची उकल करणेबाबत आदेशीत केले होते. सदर अनुषंमगाणे, पोनि. अशोक एन.लांडे, स्था.गु.शा. बुलढाणा यांनी पथके तयार करुन, त्यांना गुन्हे संबंधाने गोपनीय माहिती संकलीत करणे, संशयीत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे, तांत्रीक स्वरुपातील बाबी पडताळणे, जिल्हा व जिल्हया बाहेरील गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणे या बाबत सुचनात्मक मार्गदर्शन केले. एकंदर तपासामध्ये गोपनीय व तांत्रीक माहितीच्या आधारे गुन्ह्यांची उकल होऊन, सदर गुन्ह्यामध्ये जळगांव खां, जिल्ह्याच्या आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रमाणे आरोपी यास जळगांव खां.येथून अटक करण्यात आली.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विश्व पानसरे,अपर पोलिस अधिक्षक बुलढाणा, अशोक थोरात,अपर पोलिस अधिक्षक खामगांव, बी.बी महामुनी यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोनि. अशोक एन.लांडे, स्था.गु.शा. बुलढाणा, सपोनि. रुपेश शक्करगे, सफौ.गजानन माळी, नापोशि. गणेश पाटील,पोशि .गजानन गोरले, चालक पोहवा विजय मुंढे सर्व नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे पथकाने पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!