दुचाकी चोरी करणारे दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद; चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दुचाकी चोरी करणारे दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद; चंद्रपुर
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर – चंद्रपुर जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन- दुचाकी चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरीता पोलिस अधीक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. तेव्हा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक महेश कोडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना वाहनचोरी उघडकीस आणणेकरीता आदेशित केले. पोलिस निरीक्षक महेश कोडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक हे मोसा चोरीचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिंग राबवीत असतांना गोपनिय माहिती प्राप्त झाली की, पोस्टे रामनगर हद्दीतील एम.ई.एल. चौक परिसरात एक इसम विना नंबरप्लेट व विनाकागदपत्राची मोटारसायकल विकी करणेकरीता आलेला आहे. सदर माहितीवरुन रवाना होवून सापळा रचून आरोपी नामे आरोपी नामे 1) करण रघुनाथ वाढई, (वय 20 वर्ष), धंदा मजुरी, रा.कवढपेठ, ता. मुल, जि. चंद्रपुर 2) मयुर अतुल चिचघरे (वय 19 वर्ष), धंदा मजुरी, रा. सिंतळा, ता.मुल. जि.चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन सखोल चौकशी करुन त्यांचे कडुन एकुण ४,४०,०००/- रू. चा मुद्देमाल ताब्यात घेवून, पोस्टे रामनगर, चंद्रपुर शहर, मूल, पोंभुर्णा, मुलयेरा (जि. गडचिरोली) येथे दाखले असलेले मोसा. चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले.





अशा प्रकारे सदरची यशस्वी कामगीरी पोलिस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, यांचे नेतृत्वात पोउपनि, विनोद भुरले, पोहवा. संजय आतकुलवार, नापोकों. संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार, दिनेश अराडे, पोहवा. गोपाल पिंपळशेडे व सायबर पथकाचे प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, अमोल सावे यांनी केली आहे.



 







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!