धारदार शस्त्र बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चंद्रपुर- सवीस्तर व्रुत्त असे की , दि 15/09/2023 रोजी पोळा/तान्हा पोळा सनानिमित्य शांतता व सुव्यवस्था
राखण्यासाठी पोलिस अधिक्षक चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे रात्रौला ऑलआउट मोहीम व गुन्हेगार शोधमोहीम पेट्रोलिंग करीत असंताना महेश कोंडावार, पो.नी. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पथक यांना गोपणिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, छत्रपती नगर वार्ड क्र 2, बियाणी नगर जवळ चंद्रपुर येथे राहणारा भुषण मोतिलाल उसरेटी वय 43 वर्ष यांने आपले घरी धारधार स्टीलची तलवार लपवुन ठेवलेली आहे. या खबरेवरून त्यांचे घरी छापा टाकला असता त्याचा घरातील बेडरूम मध्ये दिवाणचे खाली लपवुन ठेवलेली स्टीलची धारधार खाचे असलेली तलवार किं 5000/- रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी विरूध्द पोस्टे रामनगर येथे कलम 4,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कामगीरी  पोलिस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलिस अधिक्षक, यांचे  मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार,स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पो. हवा. संजय आतकुलवार, नापोअ. संतोष येलपुलवार, पो.अ नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!