रेकॅार्डवरील गुन्हेगारास अवैध शस्त्रासह केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडुन 01 देशी कटटा व 05 जीवंत काडतुस केले जप्त…..
चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपूर जिल्हयामध्ये होत असलेल्या अवैध धंदे अवैध हत्यार बाळगणा-या इसमाची माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश  मुम्मका सुदर्शन पोलिस अधिक्षक, चंद्रपूर, रिना जनंबधु अप्पर पोलिस अधिक्षक चंदपुर यांनी दिले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रपूर  महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पथक अवैध रीत्या बाळगण्यावर माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवित होते. सदर मोहीमेदरम्यान पथकाला
गोपनीय माहीती मिळाली कि तुकुम तलाव, चंद्रपुर येथील के. जि.एन पान सेंटर जवळ एक इसम आपले कमरेला गावटी
बनावटीचे रिवॉर्ल्डर लावुन उभा आहे. सदर माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ रवाना होवुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्याची तपासणी केली असता सदर ईसमाच्या कमरेला लागून असलेल्या काळ्या बॅग मध्ये एक गावटी
बनावठीचे रिवॉर्ल्वर व त्यात वापरण्यात येणारे 05 नंग जीवंत काडतुस मिळुन आले. सदर ईसास त्याचे नाव विचारून क्राईम
रेकॉर्ड चेंक केले असता गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळाली आहे. सदर इसमाविरूध्द पोस्टे रामनगर येथे कलम 3,25
भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवुन आरोपी नामे जुबेर साहेबअली शेख, वय 20 वर्ष, रा. लालपेठ कॉलरी
नं.01, चंद्रपुर यांस पुढिल कायदेशीर कार्यवाहीकामी पोस्टे रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची यशस्वी कामगीरी पोलिस अधिक्षक चंद्रपूर,अप्पर पोलिस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शखा चंद्रपूर, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले,पो.हवा. संजय आतकुलवार, नापोअ संतोष येलपुलवार, पोशि,गोपाल आतकुलवार यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!