ट्रक चोरी करणारी आंतराज्यीय टोळीतील एकास मेहबुबनगर तेलंगाणा येथुन चंद्रपुर पोलिसांनी घेतले ताब्यात,दोन चोरीचे ट्रक केले जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

ट्रक चोरी करणाऱ्या  आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीस मेहबुबनगर, तेलंगणा राज्यातुन घेतले ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखा,  तसेच पोलिस स्टेशन, वरोरा यांची संयुक्तिक कामगिरी…..

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(०४) रोजी यातील फिर्यादी  रमेश सुरेश पवार, वय ४१ वर्ष, धंदा-खा. नोकरी, रा. कृष्णानगरी, तिळक वार्ड, वरोरा, जि. चंद्रपुर यांनी पोलिस स्टेशन वरोरा येथे तक्रार दिली की,त्याचा भाऊ सुरेश पवार याचे मालकीची टाटा कंपनीचा हायवा टिप्पर क्रमांक एम. एच. ३४ बी झेड ६९६३ कि ५७,००,०००/- दि ०३/०६/२०२४ रोजी सायंकाळी ७:३० वाजता दरम्यान त्याचे घराचे बाजुला उभा करून ठेवला असता रात्रीचे दरम्यान कोणी तरी अज्ञात चोराने हॉयवा टिप्पर चोरून नेला अशा फिर्यादी रमेश सुरेश पवार पोलिस स्टेशन, वरोरा येथे अप.क्र. ४६९/२०२४ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.





सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हयात चोरीस गेलेल्या हॉयवा टिप्परचा शोध घेणे कामी पोलिस अधिक्षक,अपर पोलिस अधिक्षक,  तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी,वरोरा यांचे मार्गदर्शनात तसेच पोलिस निरीक्षक स्थागुशा, चंद्रपुर व पोलिस निरीक्षक, वरोरा यांचे नेतृत्वात ट्रक चोरी बाबत पोउपनि विनोद भुरले स्थागुशा, चंद्रपुर यांचे अभिपत्याखाली स्थागुशा, चंद्रपुर व पोलिस स्टेशन, वरोरा येथील कर्मचारी नेमुण गुन्हयात चोरीस गेलेला ट्रक तसेच अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्यास सांगितले. त्यावरून सदर पथक हे चोरीस गेलेला ट्रक हा वरोरा, पांढरकवडा निर्मल येथील टोल नाक्र्गयावरील फुटेजवरुन हैद्राबाद कडे गेल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली नंतर अतिशय परिश्रम घेवुन तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून चोरीस गेलेल्या गाडीचा पाठलाग करीत राज्य तेलंगणा जिल्हा महेबुबनगर येथुन आरोपी उस्मान उर्फ चौचु भिंभंडा खान, वय २३ वर्ष, धंदा चालक, रा.कंगारका घर क्रमांक ४७, जि. मेवात, राज्य हरियाणा याचेकडुन पोलिस स्टेशन वरोरा येथुन चोरीस गेलेला टाटा कंपनीचा हॉयवा टिप्पर क्रमांक एम. एच. ३४ बी झेड ६९६३ कि ५७,००,०००/- रुपये तसेच पोलिस स्टेशन, हिगंणघाट जि. वर्धा येथुन चोरी केलेले टाटा कंपनीचा हॉयवा टिप्पर क्रमांक एम. एच. ३२ ए. जे. ३६९८ कि २८,००,०००/- रू असा एकुण ८५,००,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केला



गुन्ह्यातील अटक केलेला आरोपी उस्मान उर्फ चौचु भिंभंडा खान, वय २३ वर्ष, धंदा चालक, रा. कंगारका घर क्रमांक ४७, जि. मेवात, राज्य हरियाणा यास अधिक विचारपुस केली असता त्यांने त्याचे साथीदारसह हरियाणा राज्यातुन महाराष्ट्र व इतर राज्यात जावुन ट्रक सारखे जड वाहनांची चोरी करून तेलगंणा राज्यात नेवुन
तेथील साथीदारासह वाहनांचे इंजिन व चेचीस क्रमांक तसेच वाहनांचे समोरील क्रमांक बदलवुन वाहने हरियाणा तसेच गुजरात राज्यात पाठवीत  होते. सदर आरोपींनी यापुर्वी महाराष्ट्र तसेच इतर राज्यातुन ६ ते ८ ट्रक चोरी केल्याचे कबुल केले



सदर कामगिरी पोलिस अधिक्षक  मुम्मका सुदर्शन,अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी,वरोरा नयोमी साटम यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, ठाणेदार पोलिस स्टेशन,वरोरा पोलिस निरीक्षक, अमोल काचोरे, याचे नेतृत्वात पोउपनि विनोद जी. भुरले, पोहवा किशोर वैरागडे, रजनिकांत
पुट्ठावार,सतिश अवथरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच पोशि संदिप मुळे,विशाल राजुरकर पोलीस स्टेशन, वरोरा यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!