
कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
पोलिस स्टेशन कोरपना हद्दीतील लोणी येथे कोबंडे लढतीवर जुगार खेळणार्यावर स्थानिक गु्हे शाखेचा छापा…..
चंद्रपुर(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध धंदयावर कार्यवाही करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास येथील मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे पोलिस स्टेशन कोरपना हद्दीत लोणी गावालगत सुरू असलेल्या कोंबडे लढतीवर हारजितचा जुगार खेळणार्यावर छापा टाकला असता सदर ठिकाणावरुन १) अमोल साधुजी खरडे, वय ४e वर्ष, धंदा – शेती, रा.लोणी, ता.कोरपना जि.चंद्रपुर .२) संजय शालीक बिरसागर, वय २९ वर्ष – मजुरी, रा.वनसडी, ता.कोरपना, जि.चंद्रपुर २) अनिल किसन बेलेकर, वय 4४ वर्ष, धंदा – शेती, रा .कोलगांव, ता.मारेगांव, जि. यवतमाळ ४) राजेद्रं नानाजी खिरटकर, वय ४६ वर्ष, धंदा – शेती, रा.गोधनी, ता.मारेगाव, जि. यवतमाळ हे मिळुन आले तसेच इतर आरोपी पळुन गेले.


नमुद इसमाचे ताब्यातुन रोख रूपये ३६०0/-.४ जिवंत झुंजीकरीता लागणारे कोंबडे व ०४ मोटरसायकल असा एकुण २.४५,८००/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन नमुद इसमाविरूध्द पोलिस स्टेशन कोरपना येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कलम १२ (ब) अन्बे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस स्टेशन कोरपना करीत आहे

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक.सुदर्शन मुमक्का,अपर पोलिस रिना जनबंधु यांचे मर्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक.अमोल काचोरे यांचे नेतुत्वात सपोनि.दिपक कांकेडवार बलराम झाडोकार,पोउपनि संतोष निंभोरकर,पोहवा किशोर वैरागडे, अजय बागेसर,जयसिंग,नापोशि संतोष येलपुलवार, पोशि प्रमोद कोटनाके, मिलिंद जांभुळे, चापोहवा दिनेश अराडे सर्व स्थानिक गुहे शाखा चंद्रपुर यांनी कारबाई केली आहे



