
स्थानिक गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत जप्त केला १० लाखाचा मुद्देमाल…
तंबाखू तस्करासह दारू वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन केला लाखोचा मुद्देमाल जप्त…
चंद्रपूर (प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले होते. त्या अनुषंगाने पो.नि. महेश कोडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांनी वेगवेगळी पथके नेमुण त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत याअनुषंगाने पथकाने तंबाखू तस्करासह अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करून एकूण १० लाख १९ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेचे पथक हे कारवाईसाठी गस्तीस असताना (दि.२९एप्रिल) रोजी गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस स्टेशन, मुल हद्दीतील मौजा राजगड फाटा ता.मुल, जि.चंद्रपुर येथुन एक महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३५ के.४१५९ मध्ये अवैधरित्या दारूचा साठा वाहतुक करून गडचिरोली जिल्हयामध्ये जात आहे, अशा मिळालेल्य खबरेवरून मौजा राजगड फाटा येथे नाकेबंदी करून नमुद वाहनाला थांबवुन त्यामध्ये गाडीचा चालक नामे १) आदिल पठाण, रा.दसरा चौक, सिंदेवाही, जि.चंद्रपुर, व त्याचे सहकारी नाव २) पलाश बांबोळे, रा.राम मंदिर जवळ, सिंदेवाही, जि.चंद्रपुर यांचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये ३० नग खर्डाचे खोक्यात प्रत्येक खोक्यात १०० नग रॉकेत संत्रा ९० एम.एल. देशी दारूने भरलेली असे एकुण ३,००० नग प्रत्येकी नग ३५/- रू. प्रमाणे १,०५,०००/- रूपये चा माल तसेच गुन्हयात वापरलेली महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. ३५ के. ४१५९ किमंत ७,००,०००/- रूपये असा एकुण ८,०५,०००/- रूपये असे जप्त करून आरोपींना पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन, मुल यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

तसेच (दि.२९एप्रिल) रोजी रात्री पोलिस स्टेशन, रामनगर परिसरात पेट्रोलींग दरम्यान मुखबिरचे खबरे वरून आरोपी महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा.जी.एम. बंगल्या मागे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर यांच्या घराची तसेच त्याने किरायाने घेतलेल्या खोलीची झडती घेतली असता, सदर दोन्ही ठिकाणी ईगल हुक्का सुगंधीत तंबाकु, होला हुक्का सुगंधीत तंबाकु तसेच मजा १०८ सुगंधीत तंबाकु असा एकुण २,१४,२२०/- रूपयाचा माल जप्त करून नमुद आरोपी नामे महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा.जी.एम. बंगल्या मागे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर यास जप्त सुगंधीत तंबाकु बाबत विचारणा केली असता त्यांनी नामे जयसुख ठक्कर रा. बल्लारशाह जि. चंद्रपुर याचेकडुन आणल्याचे सांगितले. त्यावरून नमुद दोन्ही आरोपीतांविरूध्द पोलिस स्टेशन रामनगर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगरचे ताब्यात देण्यात आले. वरील दोन्ही कारवाई मध्ये स्थानिक गुन्हे शाखा यांनी एकुण १०,१९,२२०/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा किशोर वैरागडे, पोहवा रजनिकांत पुठ्ठवार, पोहवा. सतिश अवयरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.


