शिकवणीकरीता येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकास गुन्हे शाखेने पळुन जातांना अकोला येथुन घेतले ताब्यात….
कोरपना येथील खासगी शिकवणी मधे जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शारीरीक अत्याचार करणारा आरोपी शिक्षकास स्थानिक गुन्हे शाखेने अकोला येथुन घेतले ताब्यात…
कोरपना(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कोरपना येथील खासगी शाळेमध्ये इयत्ता ०६ वी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन पिडीत मुलगी आरोपीकडे दर रविवारी खासगी शिकवणीसाठी जात होती. त्याचवेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्याची माहिती आपल्या पालकांना दिल्याने पालकांनी कोरपना पोलिस स्टेशनला जावून सदरची माहिती दिल्यानंतर तात्काळ आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व लगेच पिडीतेस वैद्यकिय तपासणीकरीता जिल्हा सामान्य रूग्णालय येथे दाखल करण्यात आले.
सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त होताच पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाची चक्रे फिरवून तात्काळ दोन पथके तयार करून आरोपीचे शोधकामी रवाना केले. आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हा अकोला मार्गे मुंबईला पळून जात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त होताच अकोला येथे एक पथक रवाना होवून मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी अमोल विनायक लोडे, वय २८ वर्ष, रा. कोरपना, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपुर यांस रात्रीदरम्यान अकोला येथील बस स्थानकातुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन कोरपना यांच्या ताब्यात देण्यात आले.
महत्वाचे म्हणजे सदर शिक्षकाची एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा शहराध्यक्ष म्हुनन तीन दिवसांआधीच नेमनुक झाली होती
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि. बलराम झाडोकार, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार, पोहवा. धनराज करकाडे, नितेश महात्मे, जयंत चुनारकर, दिनेश आराडे, पोशि. मिलींद टेकाम स्थागुशा चंद्रपुर यांनी केली आहे.