ATM फोडण्याचा असफल प्रयत्न करणारे दोघे रामनगर पोलिसांचे ताब्यात,दोघांचा शोध सुरु….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

ATM मधे चोरीचा असफल प्रयत्न करणाऱ्यांना रामनगर पोलिसांनी शिताफीन घेतले ताब्यात…..

रामनगर(चंद्रपुर) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,दि.(२८) रोजी पोउपनि अतुल कावळे नाईट ड्युटी ऑफिसर म्हणुन डयुटीवर हजर असतांना नियंत्रण कक्ष येथुन माहिती मिळाली की, बंगाली कॅम्प चौक, दुर्गा माता मंदिर जवळील बँक ऑफ इंडियाचे ए.टि.एम. मध्ये कुणीतरी चोरी करण्याचा प्रयत्न केला अशा माहिती वरून बँक ऑफ इंडिया, बंगाली कॅम्पचे ए.टि.एम मध्ये जावुन पाहिले असता, ए.टि.एम. मधुन जोरजोराने सायरनचा आवाज येत असल्याचे तसेच ए.टि.एम. मधील सीसीटिव्ही. कॅमे-यावर स्प्रे मारून कॅमे-याचे वायर तोडल्याचे दिसुन आले. यावरुन पोलिस स्टेशन, रामनगर येथे अप.क्र. अप.क्र. ३६४ / २०२४ कलम ३७९, ५११ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास सुरु केला





नमुद गुन्हयाचे तपासा दररम्यान अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल गाडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील  अधिकारी तसेच कर्मचारीसह घटनास्थळी रवाना झाले. गुन्हे शोध पथकानी तात्काळ घटनास्थळाचे आजुबाजुच्या परिसरातील सी.सी.टि.व्हि. फुटेज चेक केले असता, एका काळया रंगाच्या थार गाडी मध्ये काही अज्ञात इसम ए. टि. एम. मधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन आले. तेव्हा पोलिस अधिक्षक व  अपर पोलिस अधिक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात पोउपनि मधुकर सामलवार तसेच कर्मचारी यांचे पथक तयार करून अज्ञात आरोपींचा शोध घेणे कामी रवाना केले. त्यावरून पोउपनि सामलवार यांचे पथक सी.सी. टि. व्हि. फुटेज पाहत काळया रंगाच्या थार गाडीचा पाठलाग करीत टोल नाके चेक करीत नागपुर, हैद्राबाद येथे जावुन थार गाडी व आरोपींचा शोध
घेत आरोपी नामे हुसेन अली वय २१ वर्ष, रा. पटेलवाडा, आमीरपेठ, हैद्राबाद यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांने १) मो. आमीर उर्फ अरमान मलीक रा. हैद्राबाद, २) तस्सी उर्फ तस्लीम उदय खान, वय-२६ वर्ष, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात, राज्य हरियाणा, ३) राशीद खान, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात,
राज्य – हरियाणा, ४) सल्ली उर्फ सलमान रा. भोंड, ता. फिरोजपुर, जि. मेवात यांचेसह ए.टि.एम. फोडण्याचा केविलवाणा  प्रयत्न केला असल्याचे सांगितल्याने मो. आमीर उर्फ अरमान मलीक रा. हैद्राबाद याचा हैद्राबाद येथे शोध घेतला असता मिळुन आला नाही. उर्वरीत आरोपींचा शोध घेणे कामी दिल्ली व हरीयाणा राज्यात गुरुग्राम, मेवात, फिरोजपुर येथे जावुन आरोपी राशीद खान, आरोपी सल्ली उर्फ सलमान आरोपीतांचा शोध घेतला असता, नमुद आरोपी मिळुन आला नाही. गुन्हयातील आरोपी नामे तस्सी उर्फ तस्लीम उदय खान, वय २६ वर्ष, रा. सिरोली,ता. पुणाना जि. मेवात याचा शोध घेत असतांना गुरुग्राम येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.
नमुद गुन्हयातील आरोपींची पोलिस कस्टडी रिमांड घेवुन गुन्हयात वापरलेली काळया रंगाची थार गाडी हैद्राबाद येथुन किरायाने घेवुन वेगवेगळया नंबर प्लेटचा वापर करून ए.टि.एम. मशिन तोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला असे सांगितले त्यावरून नमुद वाहन आरोपीकडुन एक काळया रंगाची थार गाडी क्रमांक टि. एस. ३१
जे. २२९९ जप्त केली तसेच अधिक विचारपुस केले असता, त्यांनी यापुर्वी जिल्ह्या चंद्रपुर येथील पोलिस स्टेशन वरोरा तसेच नागपुर जिल्हयातील विविध ठिकाणी ४ ए.टि.एम. मशिन तोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न तसेच नागपुर येथील एका ठिकाणातील मोबाईल शॉपी फोडल्याचे सांगत असुन अधिक तपास सुरू आहे.



सदर गुन्ह्यातील खालील आरोपींकडुन खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला १) हुसेन अली वय २१ वर्ष, रा. पटेल वाडा, आमीरपेठ, हैद्राबाद २) तस्सी उर्फ तस्लीम उदय खान, वय २६ वर्ष, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात, हरियाणा १) एक काळया रंगाची थार गाडी क्रमांक टि.एस. ३१ जे. २२९९ किमंत १४,००००० /- रु २) एक काळया रंगाची स्प्रे बॉटल किमंत २०० /- रू. गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा व गुन्हयात वापरलेल्या काळया रंगाच्या थार गाडीचा शोध घेणे कामी अतिशय परिश्रम घेवुन तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून आरोपीतांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, उपविभागिय पोलिस अधिकारी, सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल गाडे, दुय्यम पोलिस निरीक्षक. यशवंत कमद, गुन्हे शोध पथक, रामनगर चे सपोनि देविदास नरोटे, पोउपनि, मधुकर सामलवार, पोउपनि दिपेश ठाकरे, पोहवा सिडाम रजनिकांत, किशोर,  शरद, सतिश, आनंद, प्रशांत,नापोशि  लालु, पोशि हिरालाल, रविकुमार, प्रफुल, संदिप, विकास,विकास जाधव, पंकज, मपोहवा मोरे पोलिस स्टेशन,रामनगर तसेच सायबर पोस्टे, चंद्रपुर येथील नापोशि छगन, पोशि वैभव, भास्कर,राहुल, उमेश सहकार्याने कार्यवाही केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!