
कलर प्रिंटरच्या साहाय्याने ५०० रु च्या बनावट भारतीय नोटा छापनारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,९१ लक्ष रु च्या नोटा व साहीत्य जप्त…
५००/- रू. दराच्या ९१ लाख रू च्या बनावट रंगीत छायांकीत नोटा छापनार्या आंतराज्यीय टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा , साहीत्य केले जप्त….
चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि १० मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे चंद्रपुर शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदाराकडुन माहिती मिळाली की, उर्जानगर मेजर गेट जवळ असलेल्या राजेश अपार्टमेंट फ्लॅँट नंबर २०३ मध्ये काही ईसम हे अवैधरित्या ५००/- रू च्या रंगीत छायांकीत नोटा तयार करीत आहे



सदरच्या माहिती वरून स्थानिक गु्हेशाखेच्या पथकाने शिताफीने सापळा रचुन सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर फ्लॅट ला कुलुप लागुन होते तेव्हा फ्लॅँट मालक सुमित कालीपथ पॉल, रा.बंगाल कॅम्प चंद्रपूर हयास बोलावून माहिती घेतली असता त्याने तो प्लॅट मागील एक महिन्यापासुन मध्यप्रदेश येथील राहणारे लोकांना किरायाने दिलेला असल्याचे सांगीतले त्यावरून सदर फ्लॅट मालक व पंचाचे समक्ष फ्लँटचे लॉक तोडण्यात आले व फ्लँट मालकाचे उपस्थितीत सदर फ्लॅँटची झडती घेतली असता बेडरूमध्ये १० खरडयाच्या बॉक्समध्ये भारतीय चलनाच्या चलनी नोटाप्रमाणे हुबेहुब दिसणा-या ५०० रू दराच्या रंगीत छायांकीत नोटा एक EPSON कंपनीचे कलर प्रिंटर व इतर साहित्य असा एकुण ९११५,०००/- रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला.
तसेच सदर ठिकाणी किरायाने राहणारे आरोपींची गोपनीयरित्या माहिती कादुन त्यांच शोध घेवून आरोपी शुभम दिनेश नागर, वय २६ वर्ष, राह. पंचेड, तहसिल रतलाम, जि. रतलाम राज्य- मघ्यप्रदेश’ हयास ताब्यात घेतले सदर आरोपीने फसवणुकीच्या उद्देशाने सदरच्या रंगीत छायांकीत नोटा तयार केल्या असल्याने सदर आरोपी विरूध्द पोलिस स्टेशन दुर्गापुर येथे अप क्र १९६/ २०२६ कलम ३१८(२) ३१ ८(३), ३ ३६(२),.३ ३६(३), १८२(१) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पूढील तपास पो.स्टे. दुर्गपूर करीत आहे

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक . मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक. ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनात उपविभागिय पोलिस अधिकारी,चंद्रपुर प्रमोद चौगुले, परिविक्षाधीन पोलिस अधिक्षक गौरव कायंदेपाटील. प्रभारी अधिकारी पोलिस स्टेशन दर्गापर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, सहा गोलिस निरीक्षक दिपकं कांकरेडवार, सहा, पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोहवा जयसिंह .पोहवा सचिन गुरनुले, संतोष येलपूलवार, पोहवा गणेश मोहु्लें, नितीन रायप्रे, रजनीकांत ‘पुट्टावार, पोलिस अंमलदार किशोर वकाटे,अजित शंडे, चालक पोहवा दिनेश अराडे, प्रमोद डंभारे, महिला पोहवा निराशा तितरे ,विजयमाला वाधमारे, छाया निकोडे,, अपर्णा मानकर, महिला पोअं दिपीका सोडनार, उषा लेडांगे यांनी केली आहे.




