कुख्यात गुन्हेगार प्रशांत फुलकर याचेवर चंद्रपुर पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दुर्गापुर येथील कुख्यात चोर व तंम्बाखु तस्कर याचेवर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांची एम.पी.डी.ए. कायद्यानवये स्थानबध्दतेची कारवाई…..

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन
दुर्गापूर येथील अभिलेखावरील आरोपी  प्रशांत अरूण फुलकर वय 35वर्षे रा. सुमित्रा नगर, चंद्रपूर याचेवर विवीध पो.स्टे.अंतर्गत घरफोडी, चोरी, गंभीर दुखःपत तसेच सुगंधीत तम्बाखूची तस्करीचे गुन्हे नोंद असून त्याची दुर्गापुर . परिसरात दहशत आहे तसेच त्याने सामान्य जनतेत दहशत निर्माण केली असून गुन्हेगारी कारवाया चालु ठेवल्याने त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई केली
असतांना सुद्धा सदर आरोपी हा कायदयाला जुमानत नसल्योनच त्या बाबतची पोलिस अधीक्षक, चंद्रपूर यांनी दखल घेवून सदर
इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टी, हातभट्टी, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्तीव दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुचे काळाबाजार यांच्या विघातक कृत्यांना आळा
घालण्या बाबत अधिनियम, 1981 (सुधारणा 2009, 2015 ) अन्वये प्रस्ताव तयार करून मा.श्री. विनय गौडा भा.प्र.से., जिल्हाधिकारी,
चंद्रपूर यांचेकडे सादर केला होता





त्यांनी सदर प्रस्तावाची दखल घेवून सदर प्रस्तावीत इसम प्रशांत अरूण फुलकर वय 35 वर्षे रा.सुमित्रा नगर, चंद्रपूर यास नमुद कायदया अंतर्गत 12 महिण्या करीता स्थानबद्ध करण्याची आदेश निर्गमीत केल्याने त्यास मध्यवर्ती कारागृह येथे दाखल करण्यात आले.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन भा.पो.से., अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधु,सहायक पोलिस अधीक्षक, नवमी साठम भा.पो.से. यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक लता वाढीवे, पो.स्टे. दुर्गापूर, पोलिस निरीक्षक, महेश कोंडावार स्था.गु.शा.चंद्रपूर, स.पो.नि. योगेश खरसान स्था.गु.शा. चंद्रपूर, पो.उपनि. गिरीष मोहुतूरे पो.स्टे. दुर्गापूर, पो.हवा. अरूण खारकर, मनोज रामटेके, सुधीर मत्ते, परवरीश शेख स्था.गु.शा. चंद्रपूर, पो. कॉ. मंगेश शेंडे, पो.स्टे. दुर्गापूर यांनी सदरची कारवाई केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!