चंद्रपुर पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने बल्लारशाह येथील ३ सराईत गुंडास केले तडीपार….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चंद्रपुर – सध्या सुरू असलेले गणेशोत्सव व आगामी काळात येणारे ईद तसेच नवरात्र हे सण जनतेने शांततेत व भयमुक्त वातावरणात साजरे करण्याकरीता पोलिस स्टेशन बल्लारशाह  परिसरातील अट्टल गुन्हेगार
1) चेतन मनोहर खुटेमाटे वय 43वर्षे रा. बामणी

2 ) राकेश लक्ष्मण देरकर वय 32वर्षे रा. बामणी





3 )किशोर गुलाब मुडपल्लीवार वय 52 वर्षे रा. बामणी या ईसमांवर गंभीरस्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि ते टोळीने गुन्हे करून दहशत माजवतात म्हणून पोलिस निरीक्षक उमेश पाटील, प्रभारी पो.स्टे. बल्लारशा यांनी हद्दपार करण्या बाबत पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला त्या प्रस्तावावर  रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर यांनी कलम 55 अन्वये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे म्हणून चंद्रपूर जिल्हयातून 1 वर्षा करीता हद्दपार ( तडीपार ) केले आहे. या काळात सदर हद्दपार ईसम हे चंद्रपूर जिल्हयात कुठेही वास्तव्य करणार नाही. यापुढे ही अशा प्रकारे गंभीर गुन्हे व दहशत माजविणारे गुंड यांचेवर गंभीर प्रतिबंधक कारवाई चंद्रपूर पोलिस दला मार्फत करण्यात येणार आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!