शेतवस्तीवर दरोडा टाकुन पळ काढतांना,पोलिसांवर हल्ला करणारे ७ दरोडेखोरांना पोलिसांनी अथक परीश्रमानंतर शिताफिने केली अटक….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक 8/11/2023 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास सपोनि संदीप पाटील पोलिस ठाणे शिवुर हे शिवुर परिसरात रात्रगस्त कामी असतांना त्यांना माहिती मिळाली कि, मणेगाव हद्दीतील शेतवस्तीवर विष्णु पंढरीनाथ सुरासे यांचे घरी काही अज्ञात ईसमांनी शस्त्र दरोडा टाकला असुन तेथुन सोने व चांदीचे दागिने, मोबाईल,रोख 45,000/- रुपयांचा ऐवज घेवुन पसार झाले आहेत.
यावरून सपोनि संदीप पाटील व त्यांचे पथकांने त्यांचा माग काढत असतांना त्यांना माहिती मिळाली कि, पोलिस ठाणे देवगाव रंगारी हद्दीतील कानडगाव येथील शेतवस्तीवरील देवीदास व संगीता नलावडे यांचे कडे सुध्दा अशाच प्रकारचा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. तेथून सुध्दा सोण्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप असा एकुण 2,80,000/- रुपयांचा माल बळजबरीने हिसकावुन चोरून नेला आहे.सदर घटनेची माहीती  मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक यांना  मिळतांच त्यांनी तातडीने पोलिसांची 08 पथके तयार करून शिवुर, देवगाव रंगारी, गंगापूर, कन्नड,वैजापूर परिसरात नाकेबंदी करण्याचे आदेश देवुन कोबिंग ऑपरेशन राबविण्याचे सुचना दिल्या. यावरून पोलिस या टोळीचा अत्यंत कसोशीने माग काढुन पकडण्याचा प्रयत्न करत असतांना शिवुर पोलिस हे खामखरी नदी, कानडगाव परिसरात नदीत उतरून गडद अंधारात आरोपींचा शोध घेत असतांना त्यांना माहिती मिळाली कि, साकेगाव जवळील नायरा पेट्रोलपंपाच्या बाजुला अंधारात उभ्या असलेल्या टाटा एस गोल्ड या वाहनात बसुन काही ईसम हे भरधाव वेगात गेले आहेत. यावरून पोलिसांनी संशयीत वाहनाबाबत रोडवरील हॉटेल चालकाकडुन माहिती घेतली असता ते शिवुरच्या दिशने गेल्याचे समजले. यावरून शिवुर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. संशयीत वर्णनाचे वाहन हे शिवुर बंगल्याचे दिशने जात असल्याचे दिसताच त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी बोरसर फाटा येथे रात्री 2:30 वाजेच्या सुमारास त्यांचा वाहनांचा वेग कमी होताच पोलिसांची गाडी आडवी लावुन थांबविले. यावेळी वाहनामध्ये समोरच्या कॅबीनमध्ये दोन ईसम आढळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्याची गाडी क्रमांक एम.एच. 17 बी.वाय.9189 टाटा एस गोल्ड हीची पाहणी केली असतां गाडीचे पाठी मागील भाग हा प्लास्टिकच्या कॅरेटने भरलेला होता. पोलिसांनी गाडीची बारकाईने पाहणी केली असता तिच्या मध्ये फेरफार करून दोन कप्पे बनवले होते ज्याचे समोरिल भागात प्लास्टिकचे कॅरेट ठेवण्यात आले होते व त्याचे आडोशाने आतिल भागात 6 ते 7 व्यक्तींना बसता येईल असे नियोजन केलेले आढळुन आले. या कप्यातुन 6 ते 7 ईसम हे चाकु, तलवार असे घातक शस्त्रासह बाहेर येवुन पोलिसांचे अंगावर चाल करून येवुन त्यांचे पकडलेले दोन साथीदार सोडण्यासाठी घातक शस्त्रासह पोलिसांचे अंगावर येत असतांना त्यांना पकडण्याचा अतोनात प्रयत्न केला असता ते अंधाराचा फायदा घेवुन जानेफळ परिसरात फरार होण्यास यशस्वी झाले होते.  यावेळी शिवुर पोलिसांनी ताब्यात घेतलेले ईसमांना विश्वासात घेवुन नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव

*1) सागर रतन भोसले, वय 20 वर्षे पडेगाव ता. कोपरगाव





2) रावसाहेब भिमराव पगारे वय 35 वर्षे रा. पडेगाव कोपरगाव



असे सांगितले आहेत. मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळांना भेट देवुन गुन्हयातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखासह पोलिसांचे पथकांना सुचना केल्या तसेच पोलिसांचे नाकाबंदी मुळे आरोपी हे जानेफळ, वडजी, कोल्ही, या परिसरात लपुन असण्याची शक्यता असुन त्यांचा कसोशिने शोध घेण्याचे निर्देश दिले.
यावरून दिनांक 09/11/2023 रोजी संपुर्ण परिसरात कोंबिग सर्च ऑपरेशन सुरू असतांना स्था.गु.शाखेच्या पथकाला माहिती मिळाली कि, सदर आरोपी हे जानेफळ शिवारातील तलावाचे वरच्या भागातील निमसे पाटील यांचे तुरीच्या व मुख्तार शेख यांचे मक्याचे शेतात लपुन बसलेले आहेत. यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही शेतात पथकाने सापळा लावला असता आरोपींची हालचाल दिसुन येताच त्यांना ओरडून पोलिसांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु ते पोलिसांचे आवााहनाला दाद देत नसल्याने त्यांना पकडण्यासाठी पोलिस हे शेतात पुढे जात असतांना शेतात लपलेले दरोडेखोरांनी पोलिसांचे दिशने जोरदार दगडफेक सुरू केली. यावेळी त्यांना पुन्हा शरण येण्याचे आवाहन करता ते पोलिसांना घातक शस्त्र दाखवून अधीक आक्रमक होवुन पोलिसांना प्रतिउत्तर देवु लागले कि, आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जिवंत मारूण टाकु यावरही पथकांने त्याचे दिशने पुढे सरकत असतांना यातील दोन दरोडेखोरांनी पो.उप.नि. भगतसिंग दुल्हत व पोलीस अंमलदार निकम यांचेवर जोरदार चाकु हल्ला करून त्यांचे बरगडया, दंडावर, छातीवर, हाताचे बोटावर गंभीर धारधार शस्त्राने वार केले यावेळी त्यांचे इतर साथीदार हे जोरदार दगडफेक करत होते. यावेळी दरोडेखोर हे आक्रमक होवुन पोलिसांचे जिवीतास धोका निर्माण करत असल्याने पो.उप.नि. भगतसिंग दुल्हत यांनी त्यांचे सर्व्हिस पिस्टल मधुन 04 राऊंड हवेत गोळीबार केला. तरीही दरोडेखोर हे पोलिसांना शरण येण्याचे परिस्थीतीत नव्हते. यावेळी एक दरोडेखोर हा परत पो.उप.नि. दुल्हत यांना मारण्याचे उद्देशाने चाकु घेवुन त्यांचे दिशने अंगावर धावुन येत असतांना त्याला रोखण्यासाठी तसेच स्वत:चे जिवीताचे सह पोलिस अंमलदारचे जिवीताचे संरक्षणार्थ त्यांनी त्यांचे सर्व्हिस रिव्हाल्वर मधुन त्याचे दिशने 02 राऊंड फायर केले असता तो जखमी होवुन खाली पडला. यादरम्यान पथकांने त्यांचे इतर साथीदारसह त्यांना अत्यंत शिताफिने जेरबंद केले आहे.
यामध्ये *



1) अमीत उर्फ अमीनखान कागद चव्हाण वय 23 वर्षे रा. हिंगणी ता. कोपरगाव (जखमी )

2)शाम बडोद भोसले वय 27 वर्षे रा.पडेगाव ता. कोपरगाव

3) धीरज भारंब भोसले वय 19 वर्षे रा.पडेगाव ता. कोपरगाव

4) पांडूरंग उर्फ पांडू भारंब भोसले वय 26 वर्ष रा.पडेगाव ता. कोपरगाव

5) परमेश्वर दिलीप काळे वय 22 वर्ष रा थेरगाव ता. कर्जत जि. अहमदनगर

यांनाअटक करण्यात आली आहे* .नमुद आरोपी विरूध्द एकुण 03 गुन्हे दाखल करण्यात आले असुन यामध्ये पोलिस ठाणे शिवुर येथे भादंवी कलम 395, 397 प्रमाणे तर पोलिस ठाणे देवगाव रंगारी भादंवी कलम 395, 397 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असुन त्याचप्रमाणे पोलीस ठाणे शिवुर येथे भादंवी कलम 307,353,333,337,34 यासह कलम 4/25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नमुद कारवाई ही  मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक,  सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलिस अधीक्षक, महक स्वामी, सहा. पोलिस अधीक्षक ,सतिश वाघ, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली शिवुर पोलिस ठाणे येथील सपोनि संदीप पाटील, पोलिस अंमलदार राहुल थोरात, अमृत ठोके, विशाल पैठणकर, भरत कमोदकर, संभाजी आंधळे, श्रध्दा शेळके यांनी केली आहे तर दिनांक 9/11।23 रोजीची कारवाई मध्ये स्था.गु.शा. पथकातील पो.उप.नि. भगतसिंग दुल्लत, मधुकर मोरे, विजय जाधव, पोलिस अंमलदार सिरसाठ, दिपेश नागझरे,संजय घुगे, अशोक वाघ, वाल्मीक निकम, यांनी केली आहे.  तर देवगाव रंगारी सपोनि अमोल मोरे, पोलीस अंमलदार ऋषिकेश पैठणकर, भावसिंग जारवाल, केशरसिंग राजपूत, रोडगे यांनी आरोपीतांचा शोध मोहीम मध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!