पोलिस आयुक्तांचे विशेष पथकचा सिडको हद्दीत अवैध गुटखा गोडाऊनवर छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाने सिडको परिसरातील गुटख्याच्या गोडाऊन वर छापा टाकुन गुटखा व महिंद्रा XUV 500 चारचाकी वाहनासह  एकुण 13,19,780/- रु किंमतीचा मुद्देमाल केला जप्त….

छ.संभाजीनगर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.28 डिसेंबर 2024 रोजी 07.00 वा चे सुमारास विशेष पथक प्रमुख व पोलिस ठाणे सायबर चे पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे हे सोबतच्या पथकासोबत पोलिस आयुक्तालय हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई तसेच गुन्हेगार चेकींग कामी पेट्रोलिंग करीत असतांना पोलिस ठाणे सिडको हद्दीत आले असता पथकाला गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, एका सिल्व्हर रंगाच्या महिंद्रा कंपनीची XUV 500 या वाहनात शासनाने विक्री व साठा करण्यास प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा करण्याच्या उद्देशाने त्याची वाहतुक करुन एन -11, सुभाषचंद्र बोस नगर, हडको येथील अनिकेत लड्डा याचे गोडावुन वर टाकण्यासाठी येणार आहे,





अशा खात्रीशीर बातमी वरुन एन-11, सुभाषचंद्र बोस नगर, हडको येथील अनिकेत लड्डा याचे गोडावुनवर अचानक छापा मारला असता गोडावुन मध्ये तसेच डीलेव्हरी करण्यासाठी आलेल्या महिंद्रा कंपनीची XUV 500 क्र MH20CH7776 या कारमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला राज निवास गुटखा व सुगंधीत तम्बाखु तसेच गोडावुन मध्ये हिरा पानमसाला व Royale 717 सुगंधीत तम्बाखु असा शासनाने ब्रिकी/साठा/वाहतुक करण्यास प्रतिबंध केलेला एकुण 7,59,780/- रुपये किंमतीचा व महिंद्रा कंपनीची XUV 500 कार व मोबाईल 5,60,000/- रुपये किंमतीचा असा एकुण 13,19,780/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने इसम 1) अनिकेत गंगाकिसन लड्डा, वय 27 वर्षे, धंदा व्यापार, रा. एन-12, स्वामी विवेकानंदनगर, हडको, छत्रपती संभाजीनगर तसेच महिंद्रा XUV 500 वाहनातील चालक 2) सुनिल कल्याणराव शेंडगे, वय 25 वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. बापुरनगर, रांजणगाव (शे.पु.) ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर 3) ओम राजेंद्र झांबरे, वय 19 वर्षे, धंदा मजुरी, रा. भगतसिंग शाळेच्या पाठीमागील गल्लीत, रांजणगाव (शे.पु.) ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर व यांना गुटखा पानमसाला/सुगंधीत तम्बाखु विक्री करणारा इसम  संदीप भुमकर, रा. राजुर, ता. भोकरदन जि. जालना यांचे विरुध्द पोलिस ठाणे सिडको येथे पोहवा विनोद परदेशी यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन कलम 123,223,274,275 भारतीय न्याय संहिता सह कलम 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनिमय 2006 गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त प्रविन पवार, पोलिस उप आयुक्त (गुन्हे),प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे)सुभाष भुजंग यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस आयुक्तांचे विशेष पथक व सायबर पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे पोहवा विनोद परदेशी, सुनिल जाधव, रंजक सोनवणे, लालखान पठाण, सतिश हंबर्डे, पोशि सुनिल बेलकर, अजय दहिवाळ, सोहेल पठाण, प्रमोद सुरसे यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!