दोन सराईत वाहन चोरट्यांना गुन्हे शाखेने केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

दोन सराईत वाहन चोरट्यांना गुन्हे शाखेने केली अटक…

धाराशिव (प्रतिनिधी) – गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून तुळजापूर आणि बेंबळी हद्दीतून पिकअप-मोटारसायकल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पिकअप आणि मोटारसायकलसह (किं.3 लाख 40 हजार) अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी नमुद आरोपींना चोरीच्या पिकअप व मोटरसायकलसह तुळजापूर व बेंबळी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, यांचे आदेशावरुन सपोनि सुदर्शन कासार, पोहेकॉ. शौकत पठाण  पोहेकॉ. जावेद काझी, पोहकॉ. प्रकाश औताडे, पोहेकॉ. फरहान पठाण, चालक पोकॉ. रत्नदिप डोंगरे यांचे पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, केज, जि.बीड येथील पोलिस ठाणे बेंबळी व तुळजापूर येथील चोरीस गेलेले वाहन अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने लागलीच केज, जि.बीड येथे जाऊन आरोपीचा शोध घेत असताना दोन इसम पथकास पाहून पळून जात असताना पथकाने त्यास शिताफिने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव – 1)नय्युम शब्बीर शेख, (वय 45 वर्षे) रा.केज, जि.बीड, 2) प्रितम मोहनराव चव्हाण, (वय 27 वर्षे), रा.केज, जि.बीड असे सांगितले व त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही व आमचे इतर दोन मित्र यांनी गेल्या काही दिवसात तुळजापूर येथुन एक अशोक लिलँड दोस्त कंपनीचा पिकअप अंदाजे 3,10,000/-₹ किंमतीचा व बेंबळी येथुन एक काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल अंदाजे 30,000/-₹ किंमतीची चोरी केली आहे. अशी कबुली दिल्यावरुन नमुद आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेले एक पिकअप 1 1 मोटरसायकल असा एकुण 3,40,000/- ₹ किंमतीचा माल जप्त करुन खात्री करता ते पिकअप व मोटरसायकल पोलिस ठाणे तुळजापूर गुरंन 176/2023, कलम 379, बेंबळी पोलिस ठाणे गुरनं 335/2023 कलम 379 भा.दं.वि.सं. या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली. तसेच पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद आरोपीस चोरीच्या पिकअप व मोटरसायकलसह तुळजापूर व बेंबळी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.



अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार, पोहेकॉ. शौकत पठाण, पोहेकॉ. जावेद काझी, पोहकॉ. प्रकाश औताडे, पोहेकॉ. फरहान पठाण, चालक पोकॉ. रत्नदिप डोंगरे  यांच्या पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!