परांडा येथील कत्तलखाण्यावर धाराशिव पोलिसांचा छापा, ४९ गोवंशीय जनावरांची केली सुटका…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस अधीक्षक,धाराशिव  अतुल कुलकर्णी यांनी धाराशिव जिल्ह्यात गोवंशीय जनावराची अवैध कत्तल व वाहतुक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे….





परांडा(धाराशिव)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.०२०.१२.२०२३ रोजी परंडा शहरातील शिकलकर गल्ली
येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक संदीप ओहोळ , सफौ काझी, पोहवा जानराव, निंबाळकर, पोलिस नाईक जाधवर, पोलिस अमंलदार-कोळी, व पोलिस
मुख्यालय येथील जलद प्रतिसाद पथकाचे पोलिस अंमलदार यांच्या पथकाने दि. २०१२.२०२३ रोजी ०९.३० वा. सु. परंडा शहर येथे रवाना होउन अवैध कत्तल खान्यावर छापा टाकला.
सदर छापा कारवाई मध्ये सदर ठिकाणी काही इसम मिळून आले त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता  त्यांनी त्यांचे नाव



१) जाकीर हुसेन गुलाम गणी, वय ६० वर्षे, रा. शेख मोहल्ला इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे,



२) आशपाक सादीर वेपारी, वय ३० वर्षे, रा. कासार पट्टा इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे,

असे मिळून आले त्यांचे कडे अवैध कत्तलखाना चालवणारा मालकाविषयी चौकशी केली असता सदरचा कत्तलखाना हा

१)फाजील इस्माईल सौदागर, रा. परंडा,

२) ऐराब वाहिद सौदागर,

३) ओवेस वाहिद सौदागर दोघे रा. सिकलगर गल्ली परंडा ता. परंडा जि. धाराशिव

यांचा. असुन तो विनापरवाना असल्याचे सागितले. सदर छापा कारवाई दरम्यान पोलिस पथकाने नमुद कत्तलखान्यामध्ये मिळून आलेले अंदाजे ५००० किलो वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांस असे एकुण १०,००,००० ₹किंमतीचे, ९ गोवंशीय जातीचे जर्सी गाय, १ बैल व ४० जर्सी गायीचे वासरे किं अंदाजे २,७०,०००₹, आयशर कंपनीच्या टेम्पो एमएच ४५- १३८९ चार पिकअप १) एमएच ४५ टी २१५०, २) एमएच ११ ए.जी. ९४७०, ३) एमएच ०८ ए.पी. १४२०, ४) एमएच ११ टी ५९९८ या पिकअप व टेम्पोमध्ये देखील मांस वाहतुकीसाठी वापरलेले, लोखंडी सत्तुर, सुरी, लोखंडी टांगता वजन काटा, तसेच २९ पत्र्याचे  डब्बे, पाण्याची
मोटर असा एकुण ४२,०५,०००₹ किंमतीचा माल नमुद आरोपीच्या ताब्यात मिळून आला तो जप्त करण्यात आला आहे.
सदर जप्त करण्यात आलेले गोवंशीय जनावरांच्या मांसाचे नमुने प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, परंडा डॉ. पल्ला यांच्या मार्फतीने मांसाचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तो नगरपरिषद परंडा यांच्या डंम्पींगच्या जागेत खड्ड्यात पुरुन नाश करण्यात आला आहे. व जीवंत ९ जर्सी गाय, एक बैल, ४० जर्सी गायची वासरे अशी जनावरे हे गोशाळेत देण्याची कार्यवाही केली आहे. या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक  संदीप ओहोळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पोलिस ठाणे येथे गुरनं २७९/२०२३ महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- ५(क), ९, ९(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अपर पोलिस अधीक्षक  गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक संदीप ओहोळ, सफौ काझी, पोहवा
जानराव,  निंबाळकर, पोलिस नाईक/१४७९ जाधवर, पोलीस अमंलदार-/ कोळी, जलद प्रतिसाद पथकाचे पोलिस अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!