
नजीकच्या राज्यातुन होणार्या मद्यतस्करीवर धुळे तालुका पोलिसांची मोठी कार्यवाही,फिल्मीस्टाईल पाठलाग करुन घेतले ताब्यात…
धुळे तालुका पोलिसांनी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने लावलेल्या नाकाबंदीत अवैधरित्या होणारी मद्यतस्करीवर मोठी कार्यवाही….
धुळे(ॲड.प्रेम सोनार) जिल्हा प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सार्वत्रिक विधानसभा निवडणुक-2024 चे पार्श्वभुमीवर .विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे आदेशाने .पोलिस अधीक्षक, धुळे यांनी संपुर्ण धुळे जिल्हा पोलिस दलातील अधिकारी य अंमलदारांना दिनांक-24/10/2024 रोजीचे 00.00 ते 04.00 वाजेपावेतो ॲापरेशन ऑल आऊट राबविले त्यात नाकाबंदी करुन जिल्हयातील सराईत गुन्हेगार तपासणी, पाहिजे असलेले आरोपी शोध मोहीम, नाकाबंदी करुन वाहने तपासणी, हिस्ट्रीशिटर तपासणी, अवैध दारु, गुटखा, अंमली पदार्थ तस्करी रोखण्याची प्रामुख्याने जबाबदारी दिली होती.


त्यानुसार पोलिस अधिक्षक. श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, उप- विभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांचे मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, यांनी त्यांचे अधिनस्त असलेले अधिकारी व अंमलदारांसोबत नाकाबंदीचे आयोजन केले त्यात त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दिव दमन येथून मारुती इग्नीस गाडी क्रमांक- DD-03-M-3613 व महिन्द्रा TUV गाडी क्रमांक- GJ-15-CF-2742 यांचेत दिव दमन येथील उत्पादीत दारु नंदुरबार येथे तस्करी करुन घेवून जात असल्याची माहिती मिळाली

त्यानुसार सदर बातमीतीचे गांभीर्य लक्षांत घेवून अधिनस्त असलेले पोउनि विजय पाटील, पोहवा-किशोर खैरनार, पोहवा कुणाल पानपाटील, पोहवा-उमेश पवार, पोका-विशाल पाटील, पोशि-धिरज सांगळे, चालक पोहवा-महेन्द्र पाटील अशांनी मुंबई आग्रा रोडवर पुरमेपाडा गावाजवळ नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरू केली त्यात मिळालेल्या बातमीतील मारुती इग्नीस गाडी क्रमांक- DD-03-M-3613 व लाल रंगाची महिन्द्रा TUV गाडी क्रमांक- GJ-15-CF-2742 वाहन आढळून आले असता पोलिसांची नाकाबंदी सुरु असल्याचे पाहून नमुद वाहनावरील चालकाने पोलिसांना चुकवण्यासाठी पळून जात असतांनाच कर्तव्यावरील पोलिसांनी त्यांस थांबवण्याचा प्रयत्न केला परंतू आरोपींनी पोलीसांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी चालवुन नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीसांनी प्रसंगावधान व समय सुचकता पाळून त्यांनी रोडचे बाजुला उडी मारली म्हणून ते बचावले

अशा परिस्थितीत पोलिसांनी जिवाची पर्वा न करता पुन्हा वाहनांचा पाठलाग करुन त्यांना पकडून त्यांच्या ताब्यातील वाहनांसह अवैध मद्य तस्करी करणार्यास ताब्यात घेऊन एकुण 600000/-रुपये किंमतीची विदेशी दारु, 200000/-रुपयाचे दोन चार चाकी वाहने, असा मुद्देमाल जप्त केला असुन आरोपी ।] जयेश शैलेश डामरे वय-22 रा.सर्वोदय सोसायटी वृंदावन अपार्टमेंन्ट तिन बत्ती नानी दमन 2] गणेश विलास सोनवणे वय-21 रा.दिलीप नगर नारायण पार्क जयेश भायजी चाळ नाणी दमन ३] निलेश कुमार सदगुनभाई हरीजन वय-28 रा. झापाबार धाकली निवाडी रुम नं-4 प्रविणभाई चाळ, नाणी दमन 3] हार्दीक शैलेश ओड वय-24 रा.मशाल चौक दिपांजली अपार्टमेंन्ट साई कृपा 4 नाणी दमन यांना अटक करण्यात आली असुन नमुद प्रकरणाचा तपास धुळे तालुका पोलिस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, उप- विभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांचे मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील,पोउनि विजय पाटील, पोहवा-किशोर खैरनार, पोहवा कुणाल पानपाटील, पोहवा-उमेश पवार, पोका-विशाल पाटील, पोशि-धिरज सांगळे, चालक पोहवा-महेन्द्र पाटील यांनी केली


