
शिरपुर तालुका पोलिसांची दारु तस्करावर मोठी कार्यवाही,४८ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
शिरपुर तालुका पोलिसांची राजस्थान येथुन गुजरात येथे जाणाऱ्या दारु तस्करीला चाप,कंटेनर सकट 48 लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
शिरपुर(धुळे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळी सण व लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबादित ठेवण्यासाठी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व प्रभारींना आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे,अनधिक्रुत शस्त्र बाळगणार्या विरोधात कडक कार्यवाही व हद्दीत गस्त,नाकाबंदी करण्यासाठी आदेशीत केले होते


त्याअनुषंगाने आज दिनांक (22)रोजी शिरपुर तालुका पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्रीराम पवार हे आपले पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनिय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा कडुन शिरपुर मार्गे गुजरात राज्यात एक टाटा कंपनीचे कंटेनर मध्ये देशी-विदेशी दारुची अवैध वाहतुक करुन घेवुन जाणार आहे. अशी माहिती मिळाल्याने पोहवा संतोष पाटील, संदिप ठाकरे, कैलास पवार,सुनिल पाठक, पोशि योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर,भुषण पाटील, चापोशि मनोज पाटील यांना राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर पळासनेर गावाजवळ लोकसभा निवडणुक 2024 अनुशंगाने लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर नाकाबंदी करुन सदर वाहनाचा शोध घेणे बाबत आदेशीत केल्याने चेकपोस्टवर नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करीत असतांना बातमी प्रमाणे टाटा कंपनीचे कंटेनर क्र. NL 01 AG 9252 हे येतांना दिसले. वाहनावरील चालकास वाहन थांबविण्याचा ईशारा केला असता सदर वाहन चालक याने त्याच्या ताब्यातील वाहन थांबविले. वाहन चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव (1) विजयकुमार प्रतापसिंग वय 32 वर्षे रा. गाव- नवा ता. राजगड (सादुलपुर) जि. चुरु, राज्य-राजस्थान, क्लीनर (2) प्रदिपकुमार मानसिंग वय 33 वर्षे, रा. गाव- नवा ता. राजगड (सादुलपुर) जि. चुरु,राज्य- राजस्थान असे सांगीतले.

सदर वाहनात भरलेल्या मालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तरे दिले नाही. करीता पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात खालील वर्णनाची देशी-विदेशी कंपनीची दारु मिळुन आली. सदर वाहनात मिळुन आलेल्या देशी-विदेशी दारुचे वर्णन खालील प्रमाणे
1) समर स्पेशल वोडका 180 एम.एल.चे एकुण 120 खोके.किंमत 17,28,000/- रुपये
2) रशियन वोडका 750 एम.एल.चे एकुण 49 खोके.7,05,600/- रुपये
3) मॅकडॉवेल नं. 01, 180 एम.एल.चे एकुण 131 खोके.4,15,008/- रुपये

4) टाटा कंपनीचे कंटेनर क्र. NL 01 AG 9252 20,00,000/- रु.
असा एकुन 48,48,008/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन शिरपुर तालुका पोलिस स्टेशन येथे भादवि कलम 328,420.महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ)(ई), 80(1)(2), 83 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे,यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार,सफौ रफिक मुल्ला, पोहवा संतोष पाटील, संदिप ठाकरे, कैलास पवार,सुनिल पाठक, पोशि योगेश मोरे,संजय भोई, स्वप्नील बांगर, भुषण पाटील, कृष्णा पावरा,चापोशि मनोज पाटील यांनी केली


