जबरी चोरीचा बनाव करणारे सासरे-जावई धुळे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

जबरी चोरी करण्याचा बनाव करणारे जावाई व सासरे यांना स्थानिक गुन्हे शाखा, धुळेने केले जेरबंद

धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२०) रोजी दुपारी ०३.५० वा. विजेंद्र हिम्मत भोई रा. कासोदा ता.एरंडोल जि. जळगाव यांचे मालकीचा कापुस रविंद्र लक्ष्मण सोनवणे रा. आडगाव, कासोदा हा कापुस विक्री करुन मिळालेली रक्कम रुपये
६,८२,९१५/-  रुपये सोबत घेवून त्यांचे आयशर क्रमांक एम एच १९ झेड ५२०३ ने होळ गावाचे पुढे येत असतांना ०२ इसमांनी मोटर सायकलीवर येवून आयशर गाडीवर पुढे काचावर दगड मारुन काच फोडली व  रोख रक्कम हिसकावून घेवून पळून गेले
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक, धुळे यांचे आदेशाने पोलिस निरीक्षक,दत्तात्रय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा यांनी अधिकारी व कर्मचारी यांचे पथक नेमुन लागलीच घटनास्थळी रवाना केले. सदर पथकाने घटनास्थळी जावून घटने संदर्भात परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदार यांचे कडे विचारपुस केल्यानंतर तसेच आयशर चालक रविंद्र सोनवणे यांचे कडे  घटनेबाबत सविस्तर जाणुन घेत असतांना त्यांचे बोलणे व घडलेली हकीगत
मध्ये विसंगती आढळून येत होती. त्यामुळे त्यांचे बाबतीत संशय बळावल्यानंतर कसुन विचारपुस केली असता, आयशर चालक रविंद्र सोनवणे याने सदर हकीगत बनावट असल्याचे सांगुन त्यांना कोणीही लुटले नसुन रविंद्र लक्ष्मण सोनवणे, रा. आडगाव, कासोदे ता.एरंडोल जि. जळगाव व त्याचे सासरे मोहन निंबा महाजन रा. एरंडोल जि. जळगाव याचेशी संगणमत करुन रक्कम ६,८२,९१५/-
रुपये रोख असे सासरे यांचे कडे दिल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने लागलीच एरंडोल येथे जावून मोहन निंबा महाजन रा.एरंडोल याचे कडेस विचारपुस केली असता, त्याने सदर हकीगत
बनावट असून सदर रक्कम काढुन दिली आहे.
सदर प्रकरणी खालील रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
१) ६,८२,९१५ /- रुपये रोख
२)८००/- रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल
असा  एकुण ६,८३,७१५/- रु चा
सदरची कारवाई  श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक, धुळे,,किशोर काळे, अपर पोलिस अधीक्षक, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पो.निरी. दत्तात्रय शिंदे,पोउपनि  कैलास दामोदर, असई संजय पाटील, पोहवा संतोष हिरे, योगेश चव्हाण, प्रशांत चौधरी, हेमंत बोरसे, चेतन बोरसे, संदीप सरग, संदीप पाटील, तुषार सुर्यवंशी, प्रल्हाद वाघ नापोशि देवेंद्र ठाकुर, जगदीश सुर्यवंशी, चापोहवा  कैलास महाजन केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!