गडचिरोली पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकिच्या माध्यमातुन दुर्गम भागातील गरजु विद्यार्थी व नागरिकांना साहित्य वाटप…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गडचिरोली – गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने .पोलिस अधीक्षक  नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन आज दिनांक 01/10/2023 रोजी गडचिरोली पोलिस दल तसेच रोटरी क्लब, नागपूर साऊथ ईस्ट व माऊली सेवा मित्र मंडळ, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने दुर्गम भागातील गरजू नागरिकांसाठी विविध ‘साहित्य वाटप कार्यक्रम’ पोलिस मुख्यालय गडचिरोली येथील एकलव्य सभागृह येथे पार पडला.यावेळी दुर्गम-अतिदुर्गम भागातील 200 विद्यार्थी-विद्यार्थीनी सहीत बचत गटातील महिला व नागरिक उपस्थित होते. यामध्ये 75 विद्यार्थी-विद्यार्थींनींना सायकल, 75 नागरिकांना स्मोकलेस चूला तसेच पुरुष व महिला बचत गटांना स्प्रे-पंप व खताच्या बॅगेचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थींनी व नागरिकांना  पोलिस अधीक्षक  नीलोत्पल  यांनी गडचिरोली जिल्हयातील जनतेनी आपली आर्थिक प्रगती करावी व विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन आपली उन्नती साधावी आणि गडचिरोली पोलिस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन केले. यासोबतच महिलांना आता स्मोकलेस चूल्याच्या वापराने धुरामुळे होणारा त्रास कमी होईल. तसेच नक्षलवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलिस दलाच्या सहकार्याने जिल्हयाचा विकास साधावा व गडचिरोली जिल्हयातील जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थींनींनी व बचत गटातील पुरुष व महिलांनी व इतर नागरिकांनी सायकल तसेच इतर विविध साहित्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत गडचिरोली पोलिस दलाचे आभार मानले.

यावेळी कार्यक्रमात  पोलिस अधीक्षक  नीलोत्पल,अपर पोलिस अधीक्षक (अभियान)  अनुज तारे ,अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता  तसेच रोटरी क्लब, साऊथ ईस्ट नागपूरचे अध्यक्ष श्री. राजीव वरभे, माऊली सेवा मित्र मंडळ, नागपूरचे अध्यक्ष श्री. सुहास खरे व रोटरी क्लब, नागपूर साऊथ ईस्टच्या फस्र्ट लेडी सौ. स्मिता वरभे मॅडम हे उपस्थित होते.





सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदार



यांनी परीश्रम घेतले







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!