
गडचिरोली पोलिसांनी कवंडे पोलिस स्टेशन निर्मितीनंतर त्यापरीसरातील नक्षलवाद्यांची स्मारके केली जमीनदोस्त….
गडचिरोली पोलीस दलाने नवनिर्मित पोस्टे कवंडेच्या स्थापनेच्या दिवशीच कवंडे परिसरातील माओवाद्यांची स्मारके केली उध्वस्त,मिडदापल्ली ते कवंडे रत्यावर माओवाद्यांनी उभारली होती स्मारके…..
गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नक्षलवादी अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला आहे, ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांचा विकास साधावा व नक्षलवादी कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने काल दि 09 मार्च रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत मौजा कवंडे येथे नवीन पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात आली.


सदर नवीन पोलिस स्टेशन उभारणीच्या कार्यवाहीदरम्यान मिडदापल्ली ते कवंडे रत्यावर पोलिस स्टेशन निर्मितीच्या अगोदरच्या काळातच नक्षलवाद्यांनी स्मारके बांधलेली असल्याचे गडचिरोली पोलिस दलाच्या निदर्शनास आले होते. सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि परिसरात आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी माओवाद्यांकडून सदर स्मारकांची निर्मिती करण्यात आली होती. यावरुन मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिस दलाच्या बिडीडीएस व विशेष अभियान पथकाच्या पथकातील जवानांनी सदर परिसरात शोध अभियान सुरु केले. यादरम्यान मिडदापल्ली ते कवंडे रत्यावर तसेच पोस्टे कवंडेच्या शेजारील परिसरात एकुण 04 स्मारके नक्षलवाद्यांनी बांधलेली असल्याचे दिसून आले.

सदर नक्षलवादी स्मारकांची व परिसराची बिडीडीएस पथकाने कसून तपासणी केली व त्यानंतर विशेष अभियान पथकातील जवानांनी नक्षलवाद्यांनी बांधलेली सर्व स्मारके उध्वस्त केली गेली आहेत.तसेच नक्षलवाद्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाया अतिदुर्गम भागांमध्ये पोलिस मदत केंद्र पेनगुंडा व पोस्टे नेलगुंडा, कवंडेची स्थापना करून तसेच नक्षलवाद्याची स्मारके उध्वस्त करून गडचिरोली पोलिस दलाने परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधिक्षक (प्रशासन) एम. रमेश व अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) सत्यसाई कार्तिक, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
यावेळी पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, *“या भागात माओवादविरोधी अभियान तीव्र केले असून,नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.” यासोबतच “अशा नक्षलवाद्यांच्या स्मारकाला समाजात कुठेच स्थान नसून कोणीही अशा बेकायदेशीर बांधकामांमध्ये सहभागी होऊ नये” असे आवाहन केले आहे*


