
गडचिरोली पोलिसांनी पकडला अवैध १३८ किलो गांजा…
- गडचिरोली – जिल्हयात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्यानुसार काल दि.10/09/2023 रोजी सपोनि मिथुन सिरसाट, पोलिस मदत केंद्र मुरुमगाव यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, 03 अनोळखी इसम सिल्वर रंगाच्या होंडा सीटी कार क्र. एमएच-04-सीएम-2515 मध्ये गांजा हे मादक पदार्थ बाळगुन छत्तीसगड राज्यातुन सावरगाव-मुरुमगाव मार्गे गडचिरोलीकडे येत आहेत. त्यावरुन मुरमगाव ता.धानोरा, जि गडचिरोली येथील कटेझरी जाणारा रोड समोरील बस स्थानकासमोर सापळा लावुन सदर कारला हात दाखवुन थांबवुन तपासणी केली असता कारमध्ये पिवळया रंगाची चुंगळी, सिल्वर रंगाची चुंगळी, पांढया रंगाची चुंगळी असे 03 चुंगळयामध्ये एकुण 138 किलो 580 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ (गांजा) अंदाजे किंमत 13,85,800/- रु. मिळुन आल्याने सदर गुन्हयात वापरलेली चारचाकी वाहन सिल्वर रंगाची होंडा सीटी कार क्र. एमएच-04-सीएम-2515 किंमत 7,00000/- (सात लक्ष रु.) तसेच दोन आरोपीकडे मिळालेल्या मोबाईलची किंमत 13,000/- ( असे एकुण किंमत 20,98,800/- पोलीस मदत केंद्र मुरुमगाव येथे आणुन आरोपी
1) उमर फैय्याज अहमद शेख, वय 28 वर्ष, व्यवसाय – वाहन चालक, रा.कमला रमननगर बेंगनवाडी जवळ रजा चौक गोपाल इलेक्ट्रेशन गोवंडी मुंबई-43,
2)राकेश राजु वरपेटी, वय-26वर्ष, व्यवसाय-मजुरी, रा. सिघ्दार्थ रहिवासी सेवासंघ, टाटानगर, शिवाजीनगर एसओ मुबंई-43,


3) शहबाज सरवर खान, वय-27 वर्ष, व्यवसाय-वाहन चालक, रा. बिहॉयंन्डीग बिल्डींग नंबर-53 जवळ आचार्य कॉलेज सुभाषनगर चेंबुर मुंबई-71

यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2023 ते आतापर्यंत एकुण 416 किलो 359 ग्रॅम अंदाजे 51,91,480/- रु. किंमतीचा गांजा जप्त करण्यास गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोमके मुरुमगावचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन सिरसाट हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक निलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे अपर पोलिस अधीक्षक, अहेरी यतीश देशमुख तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी धानोरा मयुर भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस मदत केंद्र मुरुमगाव अधिकारी सपोनि मिथुन सिरसाट यांचे नेतृत्वात परि. पोउपनि राहुल चौधरी, पोहवा-नानाजी पित्तुलवार, पोअंम-दिलीप लंबुवार, पोअंम- तराचंद मोहुर्ले, पोअम-वाल्मीक कोटांगले, पोअंम-विनेश मांढरे, पोअंम-नितीन मडावी तसेचा राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 05 दौंड चे पोहवा-वैजीनाथ मदने, पोअंम-दिलीप काळे, पोअंम-दिपक जाधव तसेच सीआरपीएफ-113 बटा. चे पो.नि. मोहनसिंग व त्यांचे सोबत इतर कर्मचारी यांनी पार पाडली.



