रक्षकच बनले भक्षक! पोलिस ठाण्यात गेलेल्या महिलेवर पोलिसांनीच गँगरेप करून विकले

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हरियाणा : पतीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेवर (गँगरेप) सामूहिक बलात्कार करून तिला विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कायद्याच्या रक्षकांनीच एका महिलेची अब्रू लुटली आहे. पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्या विवाहितेला दुसऱ्याला विकून टाकले आहे. पतीविरोधात तक्रार देण्यासाठी ही महिला पोलीस ठाण्यात आली होती. तिच्यावर पोलीस सब इन्स्पेक्टर आणि त्याच्या मित्रांनी (गँगरेप) सामूहिक बलात्कार केला आहे.

आरोपींनी तिला तीन दिवस एका घरात बंद करून ठेवले होते. तिथे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. यानंतर आरोपींनी तिला अन्य एका व्यक्तीला विकले. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. अचानक रविवारी हा प्रकार उघडकीस आला. आणि खळबळ उडाली या प्रकरणी हसनपूर पोलीस ठाण्यात पीएसआय सह अन्य सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.





महिलेला एका आरोपीचा फोन सापडला, यामुळे तिने फोनवर पोलिसांना ही माहिती दिली. यामुळे तिची सुटका करण्यात आली. पोलिसांनी महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही महिला 23 जुलै रोजी हसनपूर पोलीस ठाण्यात आली होती जिथे तिची आरोपी उपनिरीक्षक शिवचरणशी भेट झाली होती. त्याने तक्रार नोंदविण्यास नकार दिला होता. शिवचरणने तिला जवळच्या शेतात जाण्यास भाग पाडले, तिथे त्याचे तीन मित्र होते. तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा अश्लील व्हिडिओही बनवला. त्या व्हिडीओच्या जोरावर तिला एका घरात घेऊन गेले आणि तिच्यावर तिथेही आळीपाळीने बलात्कार केला.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!