
शेतीसाहित्य चोरणारी टोळी जेरबंद; चंद्रपूर पोलिसांकडून ९.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर: जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचे शेतीसाहित्य आणि अवजारे चोरी करणाऱ्या आंतर-तालुका टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीचे शेतीसाहित्य आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण ९,५१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाकाबंदीदरम्यान आरोपी अटकेत मिळालेल्या माहितीनुसार, १४ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने कोसारा ते पडोली रोडवर सापळा रचून नाकाबंदी केली होती. यावेळी संशयास्पद हालचालींवरून आरोपी शिवराज चिनकन वेलपुरी (वय ३९, रा. राजीव गांधी नगर, आझाद चौक, चंद्रपूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने ग्रामीण भागातील शेतीसाहित्याच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली.

५ गुन्हे उघडकीस या अटकेमुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत असणारे एकूण ५ गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये:
-
वरोरा पोलीस ठाणे (अ.क्र. ८०३/२६)

-
बल्लारपूर पोलीस ठाणे (अ.क्र. ६८८/२६)
-
गडचांदूर पोलीस ठाणे (अ.क्र. ३४७/२६ व ३८६/२६)

-
राजुरा पोलीस ठाणे (अ.क्र. ६००/२६) या सर्व गुन्ह्यांमध्ये नवीन भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल आहेत.
९.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा बोलेरो गाडी (क्र. MH-34-CQ-1310, किंमत ७,००,००० रुपये) आणि चोरीला गेलेले २,५१,५०० रुपये किमतीचे शेतीसाहित्य व अवजारे, असा एकूण ९,५१,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तीन आरोपींचा शोध सुरू या गुन्ह्यात मुख्य आरोपी शिवराज वेलपुरी याला अटक करण्यात आली असून, त्याचे इतर तीन साथीदार सध्या फरार आहेत.
१) आकाश हरिदास बेले (रा. भद्रावती),
२) राजू वीरशप्पा स्वामीशेट्टी (रा. गडचांदूर)
३) रवी दगडुजी गदाई (रा. इंदिरानगर, चंद्रपूर) अशी फरार आरोपींची नावे असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
सदर धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर अंतर्गत उपविभाग वरोरा व उपविभाग राजुराच्या संयुक्त पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.




Policekaka Crime Beat News
Related Posts
- छत्रपति संभाजी नगर / औरंगाबाद ग्रामीण
- छत्रपति संभाजी नगर / औरंगाबाद शहर
- ताज्या बातम्या
- धडाकेबाज
- महाराष्ट्र
- मुख्य बातम्या
- सेक्स रॅकेट
छत्रपती संभाजी नगर मधे हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,दिल्ली,मुंबईसह परदेशी ललना ताब्यात…
भंडारा येथे अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलिसांनी तात्काळ केली अटक
- ताज्या बातम्या
- दारुबंदी
- धडाकेबाज
- नाकाबंदी
- नागपुर ग्रामीण
- प्रोव्हीशन रेड
- फसवणूक
- महाराष्ट्र
- मुख्य बातम्या
