गंगाझरी पोलिसांचा जुगारावर छापा ,पोलिस अधिक्षक गोंदीया यांचे आदेशाने अवैध धंदे विरोधात जिल्हाभर राबविले जातेय अभियान…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गंगाझरी(गोंदिया) ः याबाबत थोडक्यात माहिती की, .पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना नवरात्र उत्सव, दशहरा सणाच्या अनुषंगाने संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी धाडी घालून कारवाई करून जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे तसेच सट्टापट्टी, जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत निर्देश सूचना देवून आदेशित केले होते.त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक,  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी,  अशोक बनकर, यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे पोलिस स्टेशन गंगाझरी हद्दीमध्ये अवैध धंदे करणाऱ्याविरूध्द मोहीम राबविण्यात येत असून धाड कारवाई सुरू आहे.त्यानुसार  दिनांक 07-10-2023 रोजी पोलिस स्टेशन गंगाझरीचे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना गोपनीय सूत्रांकडून मौजा कोहका, ता. जि. गोंदिया येथील एका शेतामध्ये काही लोक पैसे लावून 52 तासपत्तीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार 16.30 वाजताच्या सुमारास पोलिस हे पंचासह त्या ठिकाणी गेले असता, सदर ठिकाणी त्यांना 09 इसम पैसे लावून 52 तासपत्तीचा जुगार खेळताना आढळून आले. म्हणून पोलिसांनी त्या ठिकाणी रेड कार्यवाही करून 05 इसमांना ताब्यात घेतले. परंतु उर्वरित 04 इसम तेथून पळून गेले. सदर कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून जुगार खेळण्यासाठी आलेले 05 इसम, जुगार खेळण्यासाठी आलेल्या इसमांच्या 05 मोटर सायकलस्, 04 मोबाईल फोन्स, तासपत्ती, रोख रक्कम 1,050/- रुपये असा एकूण 2,21,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.. पोलिसांनी सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन गंगाझरी येथे एकूण 09 इसमानविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 12-अ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरून ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे-
1) अशोक मंगल नागपुरे, वय 25 वर्ष,
2) जयलाल राधेलाल कनसरे, वय 42 वर्ष,
3) नितेश गणेश धुर्वे, वय 24 वर्ष, तिघेही रा. कोहका, ता. जि. गोंदिया, 4) घनश्याम भिकरांम कटरे, वय 29 वर्ष, रा. जब्बारटोला, कुडवा, ता. जि. गोंदिया,
5) सुनील फुलचंद ठाकरे, वय 35 वर्ष, रा. अंबागड, ता. तुमसर, जि. भंडारा. तसेच ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे पळून गेलेल्या इसमाबाबत विचारणा केली असता पळून गेलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे सांगितले.
1) सतीश बळीराम नान्हे, वय 35 वर्ष,
2) अभिजीत महेश मस्करे, वय 33 वर्ष, दोघेही रा. फुलचूर, ता. जि. गोंदिया,
3) मुन्नालाल रामचंद्र माहुले, वय 40 वर्ष, रा. देवरी, धापेवाडा ता. जि. गोंदिया,
4) महेंद्र डेलीराम दमाहे, वय 33 वर्ष, रा. कोहका, ता. जि. गोंदिया.

सदरची कारवाई  निखील पिंगळे, पोलिस अधिक्षक, गोंदिया,अशोक बनकर, अपर पोलिस अधिक्षक गोंदिया यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी, तिरोडा. संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनात पोनि महेश बनसोडे, पोहवा राकेश भुरे, पोना महेंद्र कटरे, प्रशांत वाहने, पोशि प्रशांत गौतम, श्रीकांत नागपुरे यांनी केली..









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!