
सराईत मोटारसायकल चोरट्यास रामनगर पोलिसांनी केले जेरबंद,३ गुन्हे केले उघड….
सराईत मोटरसायकल चोरट्यास रामनगर पोलिसांनी केले जेरबंद,चोरीच्या 3 मोटार सायकली हस्तगत….
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबात सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी- दिव्यांश रंगलाल लील्हारे- रा. कुडवा गोंदिया यांनी दि.(६) रोजी संध्याकाळी ७.०० ते ८.३० वा. दरम्यान त्याचे मालकी ची पॅशन प्रो मो. सायकल क्र. एम.एच-35/ऐ.के – 8176 किमती- 30,000/-रु.ची आयुष्य हॉस्पिटल समोर पार्किंग करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याचे रिपोर्टवर पोलिस स्टेशन रामनगर गोंदिया येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 60/024 कलम 379 भा. दं.वि. अन्वये दाखल करण्यात आला होता


पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील चोरी, घरफोडी गुन्ह्याचे अनुषंगाने दिलेल्या निर्देश सूचनाप्रमाणे डी. बी . पथकातील पोलिस अधिकारी अंमलदार यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपी व मोटर सायकल चा शोध करीत असताना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे ईसंम नामे दुर्गेश देवकरण भगत वय- 24 वर्ष रा.- कटंगीटोला यास ताब्यात घेण्यात आले

गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटारसायकल आणि ईतर चोरी संबंधाने विश्वासात घेवून विचारपूस केली असता आरोपी यांनी गुन्ह्यात चोरी गेलेली मोटरसायकल सह आणखी इतर दोन मोटर सायकली चोरी केल्याचे सांगितले आरोपीचे ताब्यातून गुन्ह्यातील आणि ईतर चोरीच्या दोन मोटारसायकल
1) पॅशन प्रो. क्र. एम. एच.- 35/ऐ.के- 8176 किमती- 30,000/-रु*

2) हिरो स्प्लेंडर प्लस एम. एच- 35/ ए. डी.1205 कि. 30,000 रु..
3) बजाज कंपनीची विक्रांता मो.सा. क्र. एम. एच.35/ ए. एफ.- 1311 किमती- 40,000/-रु.
अश्या एकूण तीन चोरीच्या मोटार सायकली कि.- 1,10,000 /-रु च्या आरोपीकडून हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेल्या आहेत आरोपी-दुर्गेश देवकर भगत रा. कटंगीटोला यास अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागिय पोलिस अधिकारी,गोंदिया रोहीनी बनकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदेश केंजळे,पोउपनि उमेश माळी, स.फौ. राजेश भुरे, नामदेव बनकर, पो. हवा. छत्रपाल फुलबांधे, सुनीलसिंह चौव्हाण, बाळकृष्ण राऊत, कपिल नागपुरे, चालक पवार यांनी केली आहे.


