
गोंदीया पोलिस जिल्हा अंमली पदार्थ विरोधी समितीच्यासह ३१ डिसेंबर नववर्षदीनी राबविणार विशेष अभियान…
पोलिस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, यांचे जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीत 31 डिसेंबर व नवंवर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांचा वापर विक्री, व सेवन करणाऱ्याविरुध्द अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे नेतृत्वात स्पेशल ड्राईव्ह (विशेष मोहिम) राबविण्याचे व कारवाई करण्याचे निर्देश..…..
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, यांचे अध्यक्षतेखाली पोलिस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील दालनात आज दिनांक 26-12- 2023 रोजी 11.00 ते 11.30 वाजता दरम्यान जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक घेण्यात आली
सदर बैठकीत पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, यांचे समवेत, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक बी. डी. जयस्वाल, औषधी निरीक्षक .अभिषेक चवरडोल, सहायक जिल्हा माहिती अधिकारी, , के. के. गजभिये, औषधी निरिक्षक डी. बी काळेल, उपवि. अधि, कार्य. गोंदिया प्रतिनिधि, व्ही. डी. झाडे. पोस्ट मास्तर, . ए. एस. कटरे, ईत्यादि प्रामुख्याने बैठकीस उपस्थित होते सदर आयोजीत बैठकीत जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या विक्री,वापरावर व सेवनावर प्रतिबंध व्हावा यादृष्टीने बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयान्वये जिल्हा पोलिस अधीक्षक तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती निखिल पिंगळे, यांनी खालील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत


1) 31 डिसेंबर व नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 27- 12- 2023 ते दिनांक 2 जानेवारी 2024 या दरम्यान स्पेशल ड्राईव्ह (विशेष मोहिमेचे) आयोजन करण्यात यावे.

2) जिल्ह्यातील अंमली पदार्थाची विक्री , वापर, व सेवन, करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.

3) मोहीम दरम्यान अंमली पदार्थांच्या विक्रीवर ,वापर करणारे त्याचप्रमाणे अवैध दारू, जुगार, सट्टा, मटका, अमली पदार्थ,गांजा, यावर विशेष मोहिमे दरम्यान कारवाई करण्यात यावी.
4) 31 डिसेंबर व नववर्ष आगमनाच्या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. अश्या वेळेस कर्ण कर्कश आवाजात डी.जे. तसेच स्पीकर चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो अश्याप्रकारे डी. जे, स्पीकर, वाजविणाऱ्यांवर लक्ष ठेवून ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्यांवर ध्वनी प्रदूषण कायदया अंतर्गत कारवाई करण्यात यावी
5) शहरात किंवा शहराचे बाहेर आयोजित केलेल्या सेलिब्रेशन पार्टीमध्ये बेकायदेशीररित्या अंमली पदार्थाचा वापर होणार नाही यादृष्टीने फार्म हाऊस, रेस्टॉरंट, हॉटेल, धाबे यांच्यावर जातीने लक्ष ठेवावे तसेच अश्या ठिकाणी अंमली पदार्थाचा वापर वा सेवन करताना आढळून आल्यास त्यांचेवर कारवाई करण्यात यावी
6) आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्या रेस्टॉरंट, हॉटेल, धाबे , यामध्ये वाजवण्यात येणारे डी.जे. स्पीकर हे रात्री दहा नंतर चालू राहणार नाहीत,यावर लक्ष ठेवण्यात येऊन रात्री दहा नंतर स्पीकर वाजणार नाहीत .याची काळजी घ्यावी रात्री 10 नंतर डी.जे., स्पीकर मोठ मोठ्याने वाजवताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
7) मोहीम दरम्यान नियमाबाहेर स्पीकर लावून कर्ण-कर्कश आवाज करत जाणाऱ्या डी.जे च्या गाड्यावर सुध्दा कारवाई करण्यात येईल
दिनांक 27/12/ 2023 ते 02/01/ 20 24 दरम्यान स्पेशल ड्राईव्ह (विशेष मोहिम) पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक. नित्यानंद झा, यांचे नेतृत्वात राबविण्यात येवून जिल्ह्यात कारवाई करण्यात येणार आहे…
जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यांतील सर्व जनतेला, नागरिकांना युवकांना आवाहन करण्यात येते की, अंमली पदार्थांच्या आहारी न जाता यापासून दूर राहावे. शक्यतो आनंदीपुर्वक वातावरणात येणारे नवंवर्षाचे स्वागत करावे.,असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे


