
अट्टल दरोडेखोराला पिस्टल व काडतुससह अटक
अटटल दरोडेखोराला देशी बनावटीचे पिस्टल व ०६ जिवंत काढतुसह अटक
स्थानिक गुन्हे शाखेची धाडशी कामगिरी


बसमत(हिंगोली )- जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्याच्या उददेशाने गुन्हेगारांचा शोध घेउन त्यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या . त्यानुसार वेळोवेळी गुन्हेगारांचा शोध घेउन त्यांच्यावर काठोर कार्यवाही करण्यात येत होती त्याअनुषंगाने
दिनांक ०३.०९.२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक वसमत भागात पेट्रोलींग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की पोलिस स्टेशन हटटा हददीमधील मौजे हयातनगर या गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चांदू सुग्रीव जाधव वय ३५ वर्ष राहणार हयातनगर ता. वसमत जि.
हिंगोली ह्याने २ दिवसापूर्वीच पिस्टल व सहा जिवंत काढतुस खरेदी केली आहे. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकांनी चांदु सुग्रीव जाधव यास हयातनगर येथील त्याच्या राहत्या घरातुन ताब्यात घेतले असता त्यानी दोन दिवसापूर्वीच मध्य प्रदेश मधून ५५,०००/- हजार रूपयाला एक पिस्टल व सहा जिवंत काढतुस खरेदी करून आणल्याचे कबुल केले व झडतीत पोलिसांना सापडले आरोपी चांदु सुग्रीव जाधव याची अधिक विचारपुस केली असता त्याचेवर या पूर्वी पोलिस स्टेशन पूर्णा जि.
परभणी येथे ०१ दरोडयाचा गुन्हा, तसेच पो.स्टे भाग्यनगर जि. नांदेड येथे घरफोडीचे ०५ गुन्हे तसेच मुळ हिंगोली जिल्हयात अनेक चोरीचे गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय यंत्रणा मार्फत सदर आरोपी पिस्टल खरेदी करून आणतााच वेळीच ताब्यात घेउन पिस्टल व जिवंत काढतुस जप्त केल्यामुळे भविष्यात होणारी एखादी मोठी जिवंत हाणी टळली आहे. हिंगोली जिल्हयात पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरिक्षक पंडीत कच्छवे स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक शिवसांब घेवारे,पोलिस अंमलदार शेख बाबर, विठठल कोळेकर, आकाश टापरे, नरेंद्र माळवे, गणेश लेकुळे, यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास हटटा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सपोनि गजानन बोराटे हे करीत आहेत.



