हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने ४ तासात केला घरफोडीचा गुन्हा उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हिंगोली – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक- १६/१०/२०२३ रोजी पोलिस स्टेशन नर्सी नामदेव हददीतील मौ. जांभरून रोडगे येथील फिर्यादी  फुलाजी लक्ष्मण रोडगे हे परीवारासह घराला कुलुप लावुन शेतामध्ये गेले होते. त्या संधीचा फायदा घेत अज्ञात आरोपीने त्यांचे घराचे पाठीमागील दरवाज्यातुन घरात येवुन घरातील डब्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व नगदी रू. असा एकुण ७२,८०० रू. चा मुददेमाल चोरून नेला होता. त्याबाबत दिनांक- १७/१०/२०२३ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारी वरून अज्ञात आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन नर्सी नामदेव येथे गुरनं. १२३ / २०२३ कलम ४५४,३८० भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने  दिनांक 7/10/2022 सदरचा गुन्हा तात्काळ उघड करून गुन्हयातील आरोपीला पकडुन मुददेमाल हस्तगत करणे बाबत  पोलिस अधीक्षक हिंगोली  जी. श्रीधर  यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देवुन मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पोलिस  निरीक्षक पंडीत कच्छवे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे तपास पथकाने तात्काळ नमुद घटनास्थळी व परीसरात भेट देवुन जलदगतीने तपासाची चक्रे फिरूवुन कौशल्यपुर्ण पध्दतीने तपास
करून अवघ्या ०४ तासात नमुदचा गुन्हा हा गणेश शंकर रोडगे वय २५ वर्ष जांभरून रोडगे ता. सेनगाव जि.हिंगोली केले बाबत निष्पन्न करून तात्काळ नमूद आरोपीस शिताफीने ताब्यात घेवुन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासात नमुद आरोपीकडुन गुन्हयात चोरून नेलेले दागीने व नगदी रक्कम जप्त करण्यात
आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे.
१) ४०,००० रू. एक तोळा सोण्याची एकदानी

२) ७,००० रू. सोन्याचे  ०८ काळेमनी दिड ग्राम वजनाचे





३) ५,००० रू. सोन्याचे १६ पोखरमनी एक ग्राम वजनाचे



 



४) २,८०० रू. चांदीचे ०४ जोडवे चार तोळे वजनाचे

५) १,४०० रू. चांदीचे ०२ बिचवे दोन तोळे वजनाचे

६)०३०० रु चांदीची ०१ अंगठी अडीच ग्राम वजनाची

७)१६३००/-रु नगदी

आरोपीकडुन वरील प्रमाणे गुन्हयात चोरून नेलेले सोन्या चांदीचे दागीने व नगदी असा एकुण ७२,८०० रू.
गुन्हयातील संपुर्ण मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक  जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक हिंगोली श्रीमती अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक स्थागुशा  पंडीत कच्छवे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश मलपिलु, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, विठठल काळे, महादु शिंदे, ज्ञानेश्वर पायघन, हरीभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, दिपक पाटील यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!