
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने केले दोन घरफोडीचे गुन्हे उघड…
हिंगोली – पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी घरफोडीचे गुन्हे उघड करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते त्या अनुषंगाने दिनांक- ३१/०८/२०२३ रोजी पोलिस स्टेशन औंढा नागनाथ हददीतील मौ. दौडगाव व दिनांक- ०२/०९/ २०२३
रोजी पोलिस स्टेशन हिंगोली ग्रामीण अंतर्गत गंगानगर येथे फिर्यादी यांचे घरी कोणीच नसल्याचे संधी साधुन अज्ञात आरोपींनी
घराचे कुलुप तोडुन घराच्या कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व नगदी रूपये चोरून नेले होते. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तकारी वरून संबधीत पोलिस स्टेशनला कलम ३८०, ४५७ मा.द.वी. अन्वये गुन्हे दाखल झाले होते.
सदरचे गुन्हे उघड करणे बाबत. पोलिस अधीक्षक हिंगोली . जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देवुन मार्गदर्शन केले होते. पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे तपास पथकाने नमुद घटनास्थळी व परीसरात भेटी देवुन तंत्रशुध्द तपास पध्दती व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने माहीती घेता सदरचे गुन्हे हे रमेश ज्ञानोबा पवार रा. वडदती ता. जिंतुर जि. परभणी व त्यांचे साथीदार यांनी केले असलेबाबत तपास पथकाला माहीती मिळाली यातील रमेश ज्ञानोबा पवार रा. वडदती यांना पो. स्टे. पिंपळदरी जि. परभणी येथे त्यांचे हददीत गुन्हयात अटक केल्यानंतर मा. न्यायालयाच्या आदेशानुसार तपास पथकाने
नमुद आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्यांनी वर नमुद दोन्ही गुन्हे त्याचे ईतर दोन साथीदार सचिन उर्फ बोबडया बापुराव भोसले व धनंजय बापुराव भोसले दोन्ही रा. कुरूळा जि. नांदेड यांचे सोबत मिळुन केल्याची कबुली दिली. तपासात नमुद आरोपीकडुन गुन्हयात चोरून नेलेले व त्याचे हिस्याला आलेले दागीने व नगदी रक्कम जप्त करण्यात आले असुन त्याची माहीती खालील प्रमाणे.
१) पो.स्टे. हिंगोली ग्रामीण गुरनं. ४१२/२०२३ कलम ३८०, ४५७ भादवी मध्ये आरोपीकडुन चोरून नेलेले
कानातले सोन्याच्या बाळया दिड ग्रॅम वजनाचे किं. ९००० रू.
चांदीच्या काकनाचे ०२ जोड चार तोळे किं. २९०० रू.
चांदीचे कोप-या ०१ जोड चार तोळयाचे किं. २९०० रू.
चांदीच्या पाटल्या ०१ जोड दोन तोळयाच्या किं. १४०० रू. असा एकुण १६,२०० रू.चा मुददेमाल


२) पोलिस स्टेशन औंढा नागनाथ गुरनं३३३ / २०२३ कलम ३८०,४५७ भादवी मध्ये नमुद आरोपीकडुन गुन्हयात चोरून
नेलेले नगदी ७००० रू.
असा एकुण २३,२०० रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक हिंगोली जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक हिंगोली श्रीमती अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक स्थागुशा . पंडीत कच्छवे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश मलपिलु, सपोउपनि संतोष वाठोरे, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, विठठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, महादु शिंदे, हरीभाउ गुंजकर, तुषार ठाकरे, दिपक पाटील यांनी केली.



