अवैधरित्या विनापरवाना वाळुची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैध वाळु वाहतुक विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही, 02 अवैध वाळु वाहतुक करणारे ट्रॅक्टर किंमत 13 लाख 10 हजार रू. चा मुददेमाल जप्त….

हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक श्री.जी.श्रीधर यांचे आदेशाने व पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनात दिनांक  ०८/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हे उघड करने व अवैध धंदे विरोधात कार्यवाही करीता पोलिस स्टेशन  हटटा हददीत पेट्टोलींग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली कि, मौ. नालेगाव शिवारात ०२ ट्रॅक्टर ट्रॉली मधुन अवैधरित्या व विनापरवाना वाळुची वाहतुक होत आहे. अशा माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौ. नालेगाव शिवारात सापळा रचुन अवैध रित्या व विनापरवाना वाळुची वाहतुक करणारे .२
ट्रॅक्टर ज्याला पासिंग नंबर नोंद नसलेले ज्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अंदाजे ०२ ब्रॉस वाळु व दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण १३ लाख १० हजार रूपयाचा मुददेमाल जप्त करून नमुद ट्रॅक्टर वरील चालक अनिल प्रकाश बारसे रा. जवळा बाजार व ट्रॅक्टर मालक माधव नारायण पावडे रा. टाकळगव्हाण तसेच दुस-या ट्रॅक्टरचा चालक अमोल दिलीप पावडे रा. टाकळगव्हाण व ट्रॅक्टर मालक प्रल्हाद वाघ रा. नालेगाव यांचे विरोधात पोलिस स्टेशन हटटा येथे
गुरनं. ०७/२०२४ व गुरनं. ०८/२०२४ कलम ३७९ भा.द.वी. सह कलम ४८ (७) (८) महाराष्ट्र महसुल जमीन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक  जी.श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थागुशा पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सहा. पोलिस निरीक्षक राजेश मलपिलु, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर सावळे, अजित सौर, तुषार ठाकरे यांनी केली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!