भडगाव पोलिसांनी ४८ तासाचे आत आरोपी निष्पन्न करुन उघड केला चोरीचा गुन्हा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चोरीस गेलेली बैलगाडी व बैल जोडीचा शोध घेऊन,भडगाव पोलिसांनी उघड केला चोरीचा गुन्हा,आरोपी निष्पन्न…

भडगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (१३) रोजी पिप्रिहाट येथील शेतकरी भिमराव शंकर पाटील वय ७० धंदा शेती रा. पिंप्रीहाट ता. भडगाव यांनी पोलिस स्टेशन भडगाव येथे तक्रार दिली की दि.( १२) रोजी सायकांळी ७.०० ते दि. (१३) रोजी सकाळी ०४.०० वाजेच्या दरम्यान पिंप्रीहाट ता. भडगाव येथुन त्यांचे मालकीची १) ०२ बैल पांढरे रंगाचे माळवी जातीचे अंदाजे ७ वर्ष वयाचे किंमत ३००००/-रु २)लोखंडी बैलगाडे किंमत २५०००/- रु जु.वा. असे एकुण ५०००/- रुपयांची चोरी झाल्याने भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं.१२१/ २०२४ भादवी.क. ३७९ प्रमाणे दिनांक १३/०४/२०२४ रोजी भिमराव शंकर पाटील रा.पिंप्रीहाट ता. भडगाव यांचे फिर्याद वरुन दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपास हा सफौ अनिल रामचंद्र अहिरे यांचे कडेस देण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपासाच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक माहेश्वर रेड्डी,सहायक पोलिस अधिक्षक अभयसिह देशमुख,चाळीसगांव भाग यांचेमार्गदर्शना नुसार पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार ह्यांचे सुचनेनुसार तपासी अधिकारी करत असतांना सदर गुन्ह्याच्या तपासात गोपणीय माहितीवरुन चोरीस गेलेली बैलजोडी व बैलगाडी हि पारोळा रस्त्याने गेल्याची माहिती मिळुन आल्याने त्या अनुषंगाने शोध घेत असतांना सदरची बैलगाडी व बैलजोडी हि पारोळा पोलिस स्टेशन हद्दीत बहादरपुर ता. पारोळा रस्त्यालगत
मिळुन आल्याने स्थानिक पोलिस स्टेशनची मदत घेऊन ताब्यात घेण्यात आली आहे. सदर बैलजोडी व बैलगाडी चोरी करणारा चोर हा पोलिसांची चाहुन लागल्याने सदर ठिकाणाहुन पळुन गेला आहे.सदर संशईत आरोपी निष्पन्न केले असुन अटक होणे बाकी आहे





सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक  महेश्वर रेड्डी,जळगाव,अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर, चाळीसगाव परिमंडळ, सहायक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख, चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार,सफौ अनिल रामचंद्र अहिरे,पांडुरंग ओंकार सोनवणे,पोहवा निलेश ब्राम्हणकार, नापोशि एकनाथ धनराज पाटील,पोशि सुनिल जयसिंग राजपुत यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास स.फौ. अनिल रामचंद्र अहिरे हे करीत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!