इन्श्युरन्स क्लेमसाठी केलेला चोरीचा बनाव पडला महागात,सरळ जेलची वारी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

इन्शुरन्स क्लेम साठी स्वतहाच्याच कारखाण्यात चोरीचा बनाव करणारा मुळ मालकच निघाला चोर…

रावेर(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(३)रोजी फिर्याद निरज सुनिल पाटील वय 24 रा. निंबोल ता रावेर जिल्हा जळगावं यांनी पोलिस स्टेशन रावेर येंथे तक्रार दिली की त्यांचे वेफर्स कंपनीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचुन लबाडीच्या ईराद्याने चोरी केली त्यावरुन  पोलिस  स्टेशन रावेर येथे 139/2024 भादवि कलम 380,427 प्रमाणे  फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







सदर चोरीचा गुन्हा उघडकिस आणणेबाबत पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,, यांनी सहा.पोलिस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह, फैजपुर यांना आदेशीत केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील फिर्यादी निरज सुनिल पाटील वय 24 रा. निंबोल ता रावेर यांच्या मालकीच्या 4,40,000/- रु किंमतीचा नांदुरखेडा शिवारातील श्रीकृष्ण केला वेफर्स फॅक्टरी मध्ये प्रवेश करुन चोरुन नेले व गावातील लक्ष्मीबाई विश्वनाथ पाटील माध्यमीक विद्यालयाचे मागील बाजुला असलेले कॅमेऱ्यांची तोडफोड करुन नुकसान केले. कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचुन लबाडीच्या ईराद्याने चोरी केला असुन सदर अज्ञात आरोपींचा CCTV फुटेज, गोपणीय बातमीदार व तांत्रीक विष्लेशनाच्या सहाय्याने पोउनि घनश्याम तांबे,पोशि सचिन घुगे,  विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे,राहुल परदेशी यांनी शोध घेतला असता सदर गुन्ह्यात आरोपी क्रमांक (1) निरज सुनिल पाटील, वय 24 वर्षे, रा. निंबोल ता. रावेर, (2) उमेश शांताराम सुतार, वय 24 वर्षे, रा.डॉ.बाबासाहेब आंडेकर चौक (मेहतर कॉलनी), (3) कौशल जितेंद्र जंजाळकर, वय 19 वर्षे, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रावेर मेहतर कॉलनी ता. रावेर जि.जळगाव यांना ताब्यात घेवुन रावेर पोलिस स्टेशन येथे घेवुन आले, सदर आरोपींना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी खालील वर्णनाचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली
1) 45,000/- रु.किं. ची बनाना वेफर्स मशीन स्पीड कंट्रोल
2) 45,000/- रु. किं. ची पोटॅटो वेफर्स मशीन .
3) 35,000/- रु. किं. ची पोटॅटो पीलर मशीन
4) 48,000/- रु.किं. ची ड्रायर मशीन .
5) 15,000/- रु. किं. ची पॅकींग मशीन
6) 17,000 /- रु. किं. ची एक ब्लोवर मशीन
7) 1,45,000/-रु.किं.ची कोटिंग पॅन मशीन
8) 90,000/- रु. किं.ची पॅकींग मशीन व सपोर्टिंग टुल्स एकुण 4,40,000/- रु किंमतीचा मुद्देमाल किंमतीचा मुद्देमाल आरोप क्रमांक (1) निरज सुनिल पाटील, वय 24 वर्षे, रा. निंबोल ता.रावेर जप्तीमधे काढुन दिला आहे.



सदर गुन्ह्यातील फिर्यादी व  आरोपी निरज पाटील आहे त्याने ईतर साथीदार आरोपी उमेश सुतार व कौशल जंजाळकर यांनी निरज पाटील याच्या श्रीकृष्ण केला वेफर्स फॅक्टरीचा विमा काढलेला होता त्याचा खोटा लाभ घेण्यासाठी त्यांनी फौजदारी
कट करून श्रीकृष्ण केला वेफर्स फॅक्टरी मधील मजुरांच्या मदतीने रात्रीची चोरी केली म्हणुन सदर गुन्ह्यात भादवि कलम 457,120
(ब),381,203 असे कलम वाढ करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, सहा. पोलिस अधिक्षक,फैजपुर अन्नपूर्णा सिंह, ,पोनि डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोउनि घनश्याम तांबे, पोलीस अमंलदार  सचिन घुगे, विशाल पाटील,प्रमोद पाटील,महेश मोगरे, राहुल परदेशी, अमोल जाधव,विकार शेख,हसुकेश तडवी,समाधान ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!