देशी बनावटीच्या पिस्तुलसह एकास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल व जिंवत काडतुस  बाळगणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,३ पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त….

जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आज दिनांक २४/०२/२०२४ रोजी जळगाव शहरातील गणेश कॉलनी रोड भागातील बजरंग बोगदयाजवळ एक संशयीत ईसम मोटार सायकलीवर पिस्तुल बाळगत फिरत असल्याचे गोपनीय माहीती
मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर इसमांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव





किशोर रामदास कोळी वय ३० व्यवसाय बिगारी रा. काचन नगर ता. जि. जळगाव



असे सांगीतले त्यांची झडती घेतली असता  त्याच्या ताब्यातुन मोटारसायकलच्या सिटखाली अंदाजे १,३१,०००/-  रु कींमतीचे एकुण ०३ गावठी बनावटीचे पिस्तुल मॅगझीन सह व एकुण ०४ जिवत काडतुस मिळुन आले त्यांना तसेच ताब्यातील मोटारसायकीलसह मिळुन आले त्यांना जागीच ताब्यात घेऊन मोटारसायकल व ईतर मुद्देमाल जप्त केला त्यावरुन जिल्हापेठ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील  तपास सपोनी मोरे हे करीत आहे.
सदरची कारवाई ही  पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधीकारी संदीप गावीत,पोलिस निरीक्षक नजन पाटील, सपोनी अमोल मोरे,पोउनि गणेश वाघमारे,गणेश चौभे, विजयसिंग पाटील, विजय पाटील, साचिन महाजन,अक्रम शेख, महेश महाजन, कीरण चोधरी, सुधाकर आभोरे, प्रितम पाटील इश्वर पाटील मपो प्रियंका कोळी, सर्व नेमनुक. स्थानिक गुन्हे शाखा अशा पथकाने कामगीरी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!