
अवैध धारदार शस्त्रासह एकास स्थागुशा ने घेतले ताब्यात….
अवैध धारदार तलवार बाळगुन लोकामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने तलवारीसह केले जेरबंद…
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जालना जिल्ह्यातील अवैध हत्यार बाळगणारे यांचे वर कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, यांना सुचना दिल्या. त्यावरुन पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना व पोलिस अमंलदार हे अवैद्य शस्त्र बाळगणारे इसमांची माहीत घेत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, एक इसम नामे शेख शहबाज शेख गणी रा. शेरसवार कॉलनी, भोकरदन नाका, जालना हा त्याचे स्वतःचे ताब्यात धारदार तलवार बाळगुन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे अशा खात्रीलायक बातमीवरुन इसम नामे शेख शहबाज शेख गणी याचा शोध घेतला असता तो त्याचे राहते घरी मिळुन आला नमुद इसमा कडुन मानवी जिवीतास धोका निर्माण होणारे धारदार टोकदार असलेली एक तलवार जप्त करण्यात आली आहे. त्याकडे मिळुन आलेल्या अवैध हत्यार संबंधी त्याचे विरुध्द पोलिस हवालदार गोपाल गोशिक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांचे तक्रारी वरुन पोलिस ठाणे सदर बाजार जालना येथे कलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक अजय बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि योगेश उबाळे, पोहवा विनायक कोकणे, गोपाल गोशिक, दिपक घुगे, लक्ष्मीकांत आडेप, सागर बावीस्कर, कैलास चेके, रमेश पैठणे स्थानिक
गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.




