स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशईतांना ताब्यात घेऊन १६ चोरीच्या मोटारसायकल केल्या जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जालना शहरातुन दुचाकी चोरणारे 02 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन, 6 दुचाकी केल्या जप्त…..

जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयामध्ये दुचाकी चोरांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत पोलिस अधिक्षक अजय बंसल व अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यानी स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते त्या वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दुचाकी चोरांसाठी विशेष पथक तयार करुन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत त्यांचे अधिनस्त पथकास सुचना दिल्या होत्या.





त्याअनुषंगाने दिनांक 26/07/2024 रोजी जालना शहरामध्ये एक इसम सय्यद अल्ताफ सय्यद अहमद, वय 21  वर्ष, रा.नॅशनल नगर,जालना हा संशयीतरित्या त्याच्या साथीदारांसोबत मोटार सायकल विक्री करीत असलेबाबत गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने त्याचा विशाल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर रोड, जालना येथे शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्हा करण्यासाठी त्याचा मित्र महंमद फिरोज ऊर्फ बब्बी कलीमोद्दीन, वय-19  वर्ष, रा.कुचरवटा,जालना व एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशांनी मिळुन जालना शहरातील मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले.



त्यानुसार महंमद फिरोज ऊर्फ बब्बी कलीमोद्दीन, वय- 19 वर्ष, रा. कुचरवटा, जालना व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता गुन्हयातील विधी संघर्षग्रस्त बालकाने जालना शहरातील विविध ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी करुन आरोपी  सय्यद अल्ताफ सय्यद अहमद व महंमद फिरोज ऊर्फ बब्बी कलीमोद्दीन यांना विक्रीकामी आणुन दिल्या व सदरच्या मोटार सायकली फायनान्स कंपनीने ओढुन आणलेल्या असल्याचे भासवुन जालना शहरातील नागरीकांना मोटार सायकल विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे ज्यांना मोटार सायकल विक्री केल्या त्या इसमांकडुन 16 मोटार
सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.आरोपीनी वरील 16 मोटार सायकल ह्या सदर बाजार, चंदनझिरा, कदीम जालना, तालुका जालना व हसनाबाद पोलिस ठाणे हददीतुन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल,अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ,पोनि सय्यद मजहर, सपोनि. योगेश उबाळे, सपोनि. शांतीलाल चव्हाण, पोलिस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, प्रशांत लोखंडे, सतिष श्रीवास, अक्रुर धांडगे, धीरज भोसले सर्व स्थागुशा, जालना यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!