अवैधरित्या पोष्टाच्या पार्सल मधे आलेल्या तलवारी स्थानिक गुन्हे शाखेने केल्या जप्त…
पोस्टाच्या पार्सलद्वारे जालना शहरामध्ये आलेल्या 03 तलवारी स्थानिक गुन्हे शाखेने केल्या जप्त….
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(28) सप्टेंबर 2024 रोजी जालना जिल्हयातील अवैध शस्त्रे बाळगणा-या आरोपीची माहिती घेऊन त्यांचा शोध घेणेकरीता विशेष मोहीम राबवणे संदर्भात पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल,अपर पोलिस अधिक्षक. आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निर्माण केले
सदर पथक जालना जिल्हा हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणा-या आरोपींची माहिती घेऊन शोध घेत असतांना खब-या मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, राहुल नटवरलाल व्यास रा. आर.पी. रोड, राम मंदीरा जवळ जालना याने 03 धारधार तलवारी पोस्टाद्वारे मागिवलेल्या असुन सदर 03 तलवारी डिलीव्हरी साठी आज रोजी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली अशी माहिती मिळाल्यावर सदरची माहिती वरिष्ठांना कळवुन हेड पोस्ट ऑफीस येथे जाऊन माहिती घेतली असता सदरच्या 03 तलवारीचे आलेले पार्सल हे राहुल नटवरलाल व्यास रा. आर.पी. रोड, राम मंदीरा जवळ जालना याचे घरी पार्सल पाठवले आहे.
त्यानंतर पथक हे त्याचे राहते घरी गेले असता त्याचे घराची झडती घेतली असता राहते घरातुन एका खाकी रंगाच्या पुठ्ठ्याच्या बॉक्स मध्ये 5000/- रु किंमतीचे 03 धारधार तलवार मिळुन आल्या सदरच्या 03 धारधार तलवारी जप्त करण्यात आल्या असुन सदर आरोपी विरुद्ध पोलिस ठाणे सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल,अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे,पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, देविदास भोजणे, सतिश श्रीवास, सोपान क्षिरसागर, धीरज भोसले सर्व स्थागुशा जालना यांनी केली आहे.