शस्त्राचा धाक दाखवुन लुटनारे ७२ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

शस्त्राचा धाक दाखवून विदेशी दारूचा ट्रक लुटणारे 04 आरोपींना 72 लाख रुपयांच्या मुद्देमालसह 72 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की, दिनांक 12 मे रोजी मध्यरात्री नागपूर- तुळजापूर महामार्गावरील आष्टा येथील टोलनाक्याजवळ दोन वाहनातून आलेल्या काही अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कंपनीचा ट्रक मध्ये बसलेल्या चालक व हेल्पर इतर दोन इसमांना मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती. ट्रक चालकाने दिलेल्या तक्रारी वरून पोलिस ठाणे चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 235/2024 कलम 395, 341, 506 भादवी व 4, 25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिस अधीक्षक सोमय मुंडे व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली व गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलिस ठाणे चाकूर येथील पोलिस अधिकारी अंमलदारांचे विविध पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन व सूचना देऊन विविध ठिकाणी तात्काळ रवाना करण्यात आले.





दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने बीड, धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे तपास करून सदर पद्धतीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस करून, तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील अज्ञात आरोपींना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेला विदेशी दारूचे 900 बॉक्स व ट्रक असा एकूण 72 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक सोमय मुंडे,अपर पोलिस अधिक्षक डॅा अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार रियाज सौदागर, राजेश कंचे, योगेश गायकवाड, प्रदीप स्वामी, राहुल कांबळे, रामहरी भोसले, मनोज खोसे, खुर्रम काझी, राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, दीनानाथ देवकते, रवी गोंदकर, तुराब पठाण, नितीन कटारे,मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, चालक पोलिस अमलदार नकुल पाटील, सचिन मुंडे, प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे, व्यंकट निटुरे, सायबर सेल चे सहाय्यक पोलिस निरीक्षक नलिनी गावडे, पोलिस अंमलदार संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे, केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!