
अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,मुद्देमाल केला जप्त…
अवैधरित्या विदेशी दारुची विक्री करण्यासाठी वाहतूक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,वाहनासह एकुन ४लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधिक्षक.सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता मार्गदर्शन करून त्यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर दि(16) ॲागस्ट 2024 रोजी लातूर शहरातील हनुमान रोड ते गुड मार्केट कडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावून विदेशी दारूची चोरटी विक्रीच व्यवसाय करण्यासाठी अवैधरित्या वाहतूक करीत असलेल्या ओमनी वाहनाला दारूच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसम सिदाजी दिलीप पवार, वय 36 वर्ष, राहणार चिकलठाणा, तालुका जिल्हा लातूर विरुद्ध पोलिस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच त्यांच्याकडून विदेशी दारू व वाहनासह एकूण 4 लाख 18 हजार 740 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक.सोमय मुंडे,अपर पोलिस अधिक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पथकामधील पोलिस अंमलदार राहुल सोनकांबळे साहेबराव हाके ,नितीन कठारे, राहुल कांबळे, मनोज खोसे यांनी सदरची कामगिरी केली आहे.



