सराईत मोटारसायकल चोरट्यास LCB च्या पथकाने घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात, 02 मोटारसायकलसह आरोपीस अटक….

लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले गंभीर  गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .
त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, तसेच माहिती घेत असताना दिनांक 13/01/ 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार चोरलेली मोटरसायकल विकण्यासाठी मांजरा गेट रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 13/01/2024 रोजी दुपारी 01:30 वाजण्याच्या सुमारास सदर पथक तात्काळ मांजरा गेट रेल्वे परिसरात पोचून रोडवर मोटार सायकलसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव



1) प्रथमेश महादेव पांचाळ, वय 18 वर्ष, राहणार येरोळ तालुका शिरूर अनंतपाळ, जिल्हा लातूर सध्या राहणार स्वामी समर्थ मंदिराजवळ लातूर.



असे असल्याचे सांगितले.तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटर सायकल काही महिन्यापूर्वी लातूर शहरातून प्रकाश नगर येथून चोरी केलेली आहे. तसेच लातूर शहरातून आणखीन एक मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले.  त्यावरून गुन्ह्यातील नमूद आरोपीला ताब्यात घेऊन त्यांने एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करुन नमूद आरोपीकडून चोरीच्या 2 मोटारसायकली ज्याची एकूण किंमत 30 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.





एमआयडीसी पोलिस ठाणे मधील मोटरसायकल चोरी एक गुन्हा उघडकीस आलेला आहे. पुढील कार्यवाहीस्तव नमूद आरोपीला पोलिस ठाणे एमआयडीसी च्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे राजेश कंचे, चालक चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!