
गुन्हे कमी करण्यासाठी पोलिस स्टेशन उदगीर येथे बकरा कापणारे विरुध्द पोलिस अधिक्षकांची सक्त कार्यवाही…
पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण येथील एक अधिकारी निलंबित तर आठ पोलिस अमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली…
लातुर(प्रतिनिधी) – याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण समोर दिनांक 31/01/2024 रोजी बकरा कापण्याचे घटनेची बातमी विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाली होती.


त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी, उदगीर दिलीप भागवत यांना सदर घटनेच्या चौकशी चे आदेश दिले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी,उदगीर दिलीप भागवत यांनी सदर घटनेची चौकशी केली असता प्राथमिक दृष्ट्या सदर घटनेस जबाबदार धरून पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण येथे कार्यरत पोलिस उपनिरीक्षक यांना निलंबित करण्यात आले असून पोलिस ठाण्यातील 08 पोलिस अंमलदारांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
तसेच पोलिस निरीक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आहे.



