वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या अकोला पोलिसांनी आवळल्या मुसक्या;४ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या अकोला पोलिसांनी आवळल्या मुसक्या;४ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला (प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयात प्रतिबंध व गुन्हे उघड करणे बाबत संदीप घुगे पोलीस अधीक्षक अकोला, अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला यांनी वेळोवेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.





या बाबत अधिक माहिती अशी की, अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चारचाकी व दुचाकी वाहणे चोरी जाण्याचे प्रकार घड़त असल्याने पोलीस अधीक्षक अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना गुन्हा उघडकीस आणुन आरोपी जेरबंद करण्याचे आदेश दिल्यावरून स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्थानीक गुन्हे शाखा येथील एक तपास पथक नेमुन गुन्हा उघडकीस करणे बाबत सुचना दिल्याने पथकाला (दि.०१जानेवारी) रोजी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमी वरून चारचाकी मालवाहू वाहन चोरी करणारे संशयीत इसम १) शेख इरशाद शेख आझाद (वय २८ वर्ष), रा. हमजा प्लॉट, जुनेशहर अकोला, २) मोहम्मद समीर अन्सारी मोहम्मद शरीफ अन्सारी (वय २४ वर्ष) रा.मेहबुबु शाह तकीया लालीज रकुल मोमीन पुरा, नागपुर यांना ताब्यात घेवून कसुन विचारपुस केली असता त्यांनी पो.स्टे. रामदास पेठ अप न ४८७/२०२४ कलम ३७९ भादवी मधील चोरी गेलेली एक TATA कंपनीची ACE MEGA XL चार चाकी मालवाहू वाहण क MH-02-ER-1847 ची किंमत अंदाजे ३,००,०००/- रूपये किंमतीची चार चाकी मालवाहु वाहन चोरल्याचे निष्पन्न झाल्याने सदर वाहन जप्त करून आरोपी, मुददेमाल सह पुढील तपास कामी पोस्टे. रामदास पेठ यांच्या ताब्यात देण्यात आले.



तसेच आरोपी नामे आदीत्य गजानन ठाकरे (वय २४ वर्ष) रा.सातेगाव, ता.अर्जनगाव सुर्जी जि.अमरातवती ह.मु. न्यु खेतान नगर कौलखेड, अकोला यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने पोस्टे. सिटी कोतवाली येथील अप क २४८/२३ कलम ३७९ भादवी मधील चोरी गेलेली काळया रंगाची स्प्लेन्डर प्रो जिचा कMH-30-AK-3701 की अं ५०,०००/- रू व पो स्टे अकोट शहर येथील अप क ४२१/२३ कलम ३७९ भादवी मधील एक काळया रंगाची हिरो स्प्लेन्डर प्लस मोसा. जिचा क. MH-30-BE-5629 की अं ५०,००० /- रू चोरी केल्याचे कबुली दिल्याने आरोपी कडुन दोन मोसा. की.अं. १,००,०००/-रू जप्त करून आरोपी पुढील तपास कामी पोस्टे. सिटी कोतवाली यांच्या ताब्यात दिला आहे. वरील नमुद आरोपीता कडुन एक मालवाहू चारचाकी वाहन टाटा एस व दोन मोटार सायकल की.अं. ४,००,०००/- रू. असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक संदीप घुगे,अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला व सपोनि कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव, ए.एस.आय. दशरथ बोरकर, पोहवा फिरोज खान, गोकुळ चव्हाण, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, नापोका, खुशाल नेमाडे, वसीमोद्दीन, पो.कॉ, आकाश मानकर, धिरज वानखडे, अभीषेक पाठक, मोहम्मद आमीर, लिलाधर खंडारे, अन्सार अहमद, उदय शुक्ला, स्वप्नील चौधरी यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!