
वर्धा जिल्हा पोलिस दलातील आर्वी उपविभागिय पोलिसअधिकारी तसेच पोलिस निरीक्षक तळेगाव व आष्टी शासनाच्या द्वितीय पुरस्काराचे मानकरी…
शासनाच्या १०० दिवसाच्या सुधारणा कार्यक्रमात पोलिस खात्याअंतर्गत पोलिस स्टेशन तळेगाव (शा.पंत) व पोलिस स्टेशन आष्टी यांनी द्वितीय पाारितोषिकाचे मानकरी ठरले…
वर्धा(प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्याच्या सर्व 358 तालुक्यातील सर्व खातेनिहाय व विभागनिहाय 10,000 शासकीय कार्यालयांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.


महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसूली विभागातील उत्कृष्ट 3 तालुका कार्यालयांची निवड आज जाहीर करण्यात आली त्यात वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर या सर्वच तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल वरील निकषाच्या आधारे निवड करण्यात आली

त्यात नागपुर विभागातून

उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय आर्वी हे द्वितीय पुरस्काराचे नामांकीत ठरले
तसेच पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन तळेगाव शा.पंत व आष्टी हे द्वितीय पुरस्काराचे नामांकीत ठरले


