वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग…

मुंबई – एका बंगल्यात ओटीटी वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान, एका २१ वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग केल्या प्रकरणी दिग्दर्शक आणि निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने मालवणी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अधिकृतपणे सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.





पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईतील एका अभिनेत्रीने जानेवारी महिन्यात मढ आयलंडच्या बंगल्यात वेब सीरिजसाठी ऑडिशन दिले होते. ही वेबसिरिज साइन केल्यावर, बंगल्यात दोन दिवसांचे शूटिंग सुरू झाले. शूटिंग सत्रादरम्यान, वेबसिरिजचा निर्माता आणि दिग्दर्शक पुनित गोयल याने अभिनेत्रीची छेड काढत तिचा विनयभंग केला. यावर तिने आक्षेप घेतला, तेव्हा गोयल यांनी ही घटना कोणाला सांगितल्यास तिचे करियर खराब होईल अशी धमकी दिली. अभिनेत्रीने शूटिंग अर्धवट सोडून थेट मालवणी पोलिसांकडे धाव घेत लेखी तक्रार दिली.



पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेतली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर आणि साक्षीदार तपासल्यावर पोलिसांनी गोयल यांच्या विरोधात विनयभंग आणि तक्रारदाराला धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. मालवणी पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. गोयल यांच्यावरील आरोपांमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (महिलेचा अपमानजनक विनयशीलता) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) यांचा समावेश आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!