आईला प्रियकराच्या मिठीत नको त्या अवस्थेत पाहिले, चिमुकल्याला छतावरून खाली फेकून दिले

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

मध्य प्रदेश : एका आईने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी आपल्याच तीन वर्षाच्या चिमुकल्याची आपल्या प्रियकराच्या मदतीने छतावरून खाली फेकून हत्या केली. कोणती आई आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याला मारू शकते का? ऐकायला हे विचित्र वाटत असले तरी हे वास्तवात घडले आहे. एका आईने तीन वर्षाच्या चिमुकल्याची आपल्या प्रियकराच्या मदतीने छतावरून खाली फेकून हत्या केली. सनी उर्फ जतिन राठोड (३ वर्ष) असे मृत बालकाचे नाव आहे. ज्योती राठोड असे आरोपी आईचे नाव आहे. त्या मुळे माता न तू वैरिणी या म्हणीचा प्रत्यय इथं येतो. आईने स्वत:च्या मुलाला छतावरून ढकलून देत त्याची हत्या केली. जेव्हा महिला शेजारच्यासोबत नको त्या अवस्थेत होती. तेव्हा तिचा ३ वर्षीय मुलगा आला. आता मुलगा वडिलांना सर्वकाही सांगेल या भीतीने आईने मुलाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले.

ही घटना ग्वाल्हेर जिल्ह्यात घडली आहे. येथील पोलीस कॉन्स्टेबल ध्यान सिंह यांची पत्नी ज्योति राठोड हिचे शेजारी राहणाऱ्या उदय इंदोलिया याच्याशी अनैतिक संबंध होते. याच संबंधातून दोघांनी दि.२८ एप्रिल रोजी आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला घराच्या छतावरून खाली फेकून त्याची हत्या केली होती. या चिमुकल्याचा गुन्हा इतकाच होता की, त्याने आपल्या आईला प्रियकराच्या मिठ्ठीत नको त्या अवस्थेत पाहिले होते. महिलेला वाटले की, तिचा मुलगा पतीला तिच्या प्रेस संबंधाबाबत सांगेल. याच भीतीने तिने आपल्या पोटच्या मुलाला छतावरू खाली फेकले. दोन मजली इमारतीवरून पडल्याने मुलाच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्याच्यावर जयारोग्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला घरातील लोकांना वाटत होते की, पाय घसरल्याने त्यांचा मुलगा घराच्या छतावरून खाली पडला व त्याचा मृत्यू झाला.





मात्र काही दिवसानंतर ज्योतिने स्वत:च आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पतीने त्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. हा पुरावा पोलिसांना दिला, त्यानंतर पोलिसांनी ज्योती राठोड व तिचा प्रियकर उदय इंदोलिया यांना अटक केली. घटनेवेळी उदयही घराच्या छतावर होता. दि.२८ एप्रिल रोजी प्लास्टिक दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ध्यान सिंह यांनी अनेक लोकांना आमंत्रित केले होते. यामध्ये उदयचाही समावेश होता. दरम्यान सर्वांची नजर चुकवून ज्योति आणि उदय घराच्या छतावर गेले होते. त्यावेळी चिमुकला सनीही आईच्या मागे-मागे तेथे पोहोचला. त्याला पाहून आई घाबरली व तिने स्वतःच्याच मुलाची हत्या केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!