मुंबईत हवाई सुंदरीची गळा चिरुन निर्घुन हत्या

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मुंबई–  पवई इथं एका विमान कंपनीत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मरोळ
इथल्या राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, रूपल ओगरे (वय २३, मूळगाव रायपूर, छत्तीसगड) असं या एअर होस्टेसचं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच असलेल्या अंधेरी उपनगरातील मरोळ इथल्या एनजी कॉम्प्लेक्स इथं ती आपली बहिण आणि मित्रासोबत रहायला होती. दरम्यान, हत्येची घटना घडली तेव्हा रुपल घरी एकटीच होती कारण तिची बहिण आणि मित्र हे दोघेही आपल्या गावी गेले होते. पवई पोलिस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!