नागपुर शहर गुन्हे शाखेने गॅस सिलेंडर ट्रक चोरीचा केला उलगडा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपुर शहर गुन्हे शाखेने गॅस सिलेंडर ट्रक चोरीचा केला उलगडा,मुख्य सुत्रधाराचा शोध सुरु….

नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपूर शहर गुन्हे शाखा (डिटेक्शन) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर पोलिस ठाणे बेलतरोडी हद्दीतून चोरी गेलेला ट्रक आणि गॅस सिलेंडर हा जप्त करून गॅस सिलेंडर चोरीचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणी तोफसिंग तुडीलाल पारधी, (वय 48 वर्षे), रा.प्लॉट नं. 172 जयदुर्गा मनिष नगर नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बेलतरोडी पोलिस ठाण्यात 363/24 कलम 379 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत अशोक लिलेन्ड कंम्पनीचा ट्रक, एचपी कंपनीचे एकुण 482 भरलेले सिलेंडर असा एकुण 24 लाख 50 हजार रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, दि.(२) रोजी दुपारी २.०० ते दि.(३) चे सकाळी ७.०० वा चे दरम्यान यातील फिर्यादि तोफसिंग यांनी त्यांचा अशोक लेलॅन्ड कंम्पनीचा ट्रक क्र. एमएच 40 एके 6298 ज्यामध्ये 504 भरलेले सिलेंडर असा एचपीसीएम कंपनीचे लगत सर्व्हिस रोडवर लावुन ठेवला असता कुणीतरी अज्ञात चोराने नमुद ट्रक सिलेंडरसह एकुण 25,00,000/-रु. चा  हा चोरुन नेला अशा फिर्यादिच्या तक्रारीवरुन पोलिस स्टेशन बेलतरोडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्हयाचा समांतर तपास वरिष्ठांचे आदेशाने सेंट्रल युनिट वाहनचोरी पथक, घरफोडी, चैन स्नाचिंग हे करीत होते. सदर तापासात तांत्रीक व व्यावसाईक कौशल्य वापरुन व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी  शार्दुलसिंग उर्फ दुल्ला बलदेवसिंग संधो रा.बाबादिपसिंग नगर, पो.ठाणे कपीलनगर नागपूर याने साथिदारासह मिळुन केलेला असुन सध्या तो ट्रक घेवुन शिवनी मध्यप्रदेश येथे गेलेला आहे.



अशा माहीतीवरुन पोउपनि.अनिल इंगोले व पथक शिवनी मध्यप्रदेश येथे गेले असता. त्यांनी त्यांच्या व्यवसायीक कौशल्याचा वापर करुन ट्रक व मुददेमाल हा लांबटा गावाजवळ असल्याचे निष्पन्न केले. सदर ठिकाणी जावुन गुन्हयातील ट्रक असलम इनायत खान (वय 30 वर्षे) रा.शिवनी पब्लीक स्कुल,संजय वार्ड शिवनी मध्यप्रदेश याचेकडुन जप्त केला. सदर गुन्हयातील मुख्य आरोपी शार्दुलसिंग संधो व त्याचा साथीदार फरार असुन त्याचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.



सदरची कारवाई पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंगल, सहपोलिस आयुक्त अश्वती दोर्जे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) संजय पाटील, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन)नितीम गोयल,सहा पोलीस आयुक्त (डिटेक्शन), डॉ.अभिजीत पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या दरोडा  व वाहनचोरी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोउपनि.अनिल इंगोले,. झिंगरे व टिम (सायबर सेल), पोहवा. दिपक रिठे,.विलास कोकाटे, नापोशि.अजय शुक्ला,पंकज हेडाऊ, पो.शि. कपीलकुमार तांडेकर,राहुल कुसरामे,अभय ढोणे, सर्व नेमणुक वाहनचोरी विरोधी पथक, गुन्हे शाखा, नागपूर शहर सेंट्रल पथक यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!