
अटल गुन्हेगारास ताब्यात घेऊन जरीपटका पोलिसांनी उघड केले ६ घरफोडीचे गुन्हे….
जरीपटका पोलिसांनी घरफोडीचे गुन्हे करणारे अटल गुन्हेगारास ताब्यात घेऊन. ८,७०,१००/-रु किंमतीचा मुददेमाल केला जप्त, ६ घरफोडीचे गुन्हे केले उघड…..
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी अमीत सोभराजमल भोजवानी, वय ३४ वर्षे, रा. फ्लॉट नं. १४६, दयानंद पार्क हॉउसिंग बोर्ड सोसायटी, जरीपटका, नागपुर याचे रहाते घरी दि. २६ जानेवारी चे रात्री दरम्यान मुख्य दरवाजाचे लॉक तोडुन आत प्रवेश केला तसेच रूमच्या आत ठेवलेल्या लोखंडी आलमारी व लाकडी आलमारीचेही लॉक तोडुन त्यामधील सोन्या चांदीचे दागीने नगदी असे एकुण १३,२०,४००/- रू चा मुददेमाल चोरून नेला याबाबत प्राप्त तक्रारीवरुन अप क ५९/२०२५ कलम ३०५ (१), ३३१(३), ३३१(४) भा.न्या. संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.


सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान मागील ८ दिवसात साधारण १८० CCTV फुटेजची पाहणी करून संशयीत आरोपीचे कॉल डिटेल प्राप्त करून मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोउपनि आशिष मोरखडे यांचे तपासपथकाने आरोपीस निष्पन्न केले व गुन्हयात सहभाग असलेले तीन विधीसंघर्षित बालकाना ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली. त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल देवुन त्याव्यतिरीक्त खालील नमुद गुन्हे केल्याचीही कबुली दिली.

१) अप क्र. ०५/२५ कलम ३०५ (अ), ३३१ (३),३३१ (४) भारतीय न्याय संहीता (चोरीस गेलेला मुद्देमाल: रु.४,२०,०००/-)२) अप क्र. २९/२५ कलम ३०५ (अ), ३३१ (३),३३१ (४) भारतीय न्याय संहीता (चोरीस गेलेला मुद्देमालः रु. १२,०००/-)३) अप कं. ५३/२५ कलम ३०५(अ),३३१(३),३३१ (४) भारतीय न्याय संहीता (चोरीस गेलेला मुद्येमाल: रु. १०,०००/- ४) अप क. १७/२५ कलम ३०५ (अ), ३३१(३),३३१ (४) भारतीय न्याय संहीता (चोरीस गेलेला मुरोमालः रु. २५,०००/-) ५) अप क. १५/२५ कलम ३०५ (अ),३३१ (३),३३१ (४) भारतीय न्याय संहीता (चोरीस गेलेला मुझेमालः रु. ५,०००/-सदर विधिसंर्पर्षित बालकाकडुन वरील गुन्हयातील एकूण. रु. १,६७,४५०/- किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आलेला आहे.तसेच विधीसंघर्षीत बालकांना पैशाचे आमिष देवुन गुन्हे करण्याकरीता प्रवृत्त करून त्यांचेकडुन वर नमुद गुन्हे करून त्यांचेकडील चोरीचा मुददेमाल आपल्याकडे घेवुन तो विकण्याच्या तयारीत असलेला आरोपी आशिष उर्फ बोडया यादवराव चौधरी वय ४२ वर्ष, याला अटक करुन त्यांचेकडुन अप क्र. ५९/२५ व अप क्र. ०५/२५ प्रमाणे दाखल गुन्हयातील रु. ७,०३,१००/-किंमतीचे दागीने जप्त करण्यात आलेले आहेत.

अशा प्रकारे विधीसंपर्षित बालके व आशिष उर्फ बोडया यादवराव चौधरी यांचेकडुन चोरीस गेलेल्या एकुण रु १७,९२,४००/- किंमतीचे मुद्देमालापैकी एकुण रु. ८,७०,१००/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आले आहे.तसेच आरोपी आशिष उर्फ बोडया यादवराव चौधरी हा जरीपटका पो. ठाणे अप क्र. ६७/२५ कलम १०९, १८९(२) (४), ७५(२), ५४ प्रमाणे दाखल गुन्हयात देखील पाहीजे आरोपी होता.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार,सिंघल सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त परीमंडळ ५ निकेतन कदम, सह पोलिस आयुक्त जरिपटका विभाग सत्यवीर बंडीवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जरीपटका पो. ठाणे अरूण क्षिरसागर,यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, पो. हवा पंकज ठाकुर, अमित सचिन भनिष , नापोशी नितीन, पोअं प्रमोद नितेश,राहुल, अमोल सागर अनुज विकास, पवन,गंगाधर तसेच पोलिस उप आयुक्त परी.क्र.०५ मधील सायबर विभागाचे आशिष सचिन यांनी मिळून पार पाडली आहे.


