
ॲापरेशन थंडर व्यसनमुक्तीसाठीची एक चळवळ – श्री निकेतन कदम
ऑपरेशन थंडर २०२५ : नागपूर शहर पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेत नागपुरकरांचा अभूतपूर्व सहभाग…
ॲापरेशन थंडर व्यसनमुक्तीसाठीची एक चळवळ – श्री निकेतन कदम



पोलिस आयुक्त डॅा रवींद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर पोलिसांनी दिनांक २० ते २६ जून दरम्यान ऑपरेशन थंडर २०२५ ही व्यापक स्वरूपातील, आठवडाभर चालणारी अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम यशस्वीरीत्या राबवली. “Evidence is clear: Invest in Prevention” या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिनाशी सुसंगत अशा संकल्पनेतुन सुरु झालेल्या या अभियानात नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि नागपूरने देशपातळीवर ‘ड्रग्स विरुद्ध लढणारे शहर अशी ओळख निर्माण केली.

दृष्टीकोन आणि नियोजन: संपूर्ण शहराची एकजूट ऑपरेशन थंडर २०२५ यासारख्या व्यापक मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि जबाबदारीची बाब होती. या मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत संपूर्ण पोलिस दल, वरिष्ठ अधिकारी, पोलिस कर्मचारी, स्वयंसेवक, डिजिटल मीडिया टीम, प्रशासकीय कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचा अमूल्य सहभाग होता. सामूहिक प्रयत्न, शिस्त आणि समर्पणामुळेच ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली.ही मोहीम बहु-हितधारक दृष्टिकोन ठेवून नियोजित करण्यात आली होती ज्यात शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, नागरी समाज, प्रसारमाध्यमे आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणा यांचा समन्वय करून अनेक समित्यांची स्थापना करण्यात आली. प्रत्येक विभागासाठी पोलिस उपाय्क्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली गेली. जवळपास ५० पेक्षा अधिक मोठ्या प्रत्यक्ष कार्यक्रमांचे यशस्वी नियोजन आणि डिजिटल मोहिमेचा समन्वय साधन्यात आला.

व्यवस्थापन आणि विभागीय समन्वय – या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे समन्वित आणि सहभागी व्यवस्थापन, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, राजकीय आणि धार्मिक नेतृत्व यांच्याशी समन्वय साधून नागपूर पोलिसांनी सर्व कार्य यशस्वीरीत्या पार पाडले. स्वयंसेवकांचे समन्वयन, प्रचार, वाहतूक आणि सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथके कार्यरत होती.ज्यातुन याची उत्कृष्ट अंमलबजावणी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
ऑपरेशन थंडर २०२५ चे प्रत्यक्ष अंमलबजावणी टप्प्यातील यश अतुलनीय ठरले. ५०,००० हून अधिक नागरिक प्रत्यक्ष सहभागी झाले. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी, पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल, खासदार, आमदार, आणि अनेक धर्मगुरु व सामाजिक नेते उपस्थित होते.ज्यात १५ लाखांहून अधिक नागरिकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवरून सहभाग नोंदवला.ज्यामधे प्रमुख विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रमुख कार्यक्रमांमध्येः
शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती रॅलीज आणि अंमलीपदार्थ विरोधी सामूहिक शपथ
खेळ स्पर्धा – आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश
अंमलीपदार्थ विरोधी आरोग्य व कायदे विषयक सेमिनार्स
नुक्कड नाटकं – संवेदनशील परिसरांमध्ये सादरीकरण
मुक्तांगण पुणे आणि मैत्री संस्था नागपूर येथील ड्रग्स पीडितांचे आत्मकथन, व्यसनमुक्तीच्या कथा
क्रिएटिव्ह स्पर्धा – रील, पोस्टर, निबंध स्पर्धा
ऑपरेशन थंडर अंतर्गत 123 अंमली पदार्थ संदर्भात रेकॉर्डवरील गुन्हेगारांना समुपदेशन आणि त्यांच्या रेकॉर्डची सिंबा अॅप मध्ये नोंद करुन ज्याची अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती करण्यासाठी ऑपरेशन थंडर संकेतस्थळ बनविण्यात आली या मोहीमेत महत्त्वाचा टप्पा म्हणजे NDPS गुन्ह्यांत जप्त मालमत्तेचा (मुद्देमाल) सुमारे ₹२७ कोटींचा नाश, जो एक स्पष्ट संदेश देणारा आणि पारदर्शकतेचा प्रतीक ठरला.
शिखर कार्यक्रम – २५-२६ जून राष्ट्रीय परिषद या मोहिमेचा सर्वोच्च बिंदू ठरली २५ व २६ जून रोजी आयोजित राष्ट्रीय परिषद. यात देशभरातील ३० पेक्षा अधिक मान्यवर पॅनलिस्ट्स सहभागी झाले. यामध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, पोलीस अधिकारी, वकील व व्यसनमुक्त झालेल्या व्यक्ती यांचा समावेश होता.या परिषदेला प्रत्यक्ष आणि ऑनलाईन मिळून १०,००० हून अधिक नागरिक सहभागी झाले. बंदी, उपचार, पुनर्वसन, शिक्षण आणि धोरणात्मक सुधारणा या विषयांवर सखोल चर्चा झाली आणि प्रभावी उपाययोजना मांडल्या गेल्या.
एकत्रित यश – शहराची लढाई व्यसनाविरुद्ध – ऑपरेशन थंडर २०२५ हे उदाहरण ठरले की एकजूट, प्रेरणादायी नेतृत्व आणि नागरिकांचा सहभाग असेल तर कोणत्याही गंभीर सामाजिक संकटाचा मुकाबला यशस्वीपणे करता येतो.
पोलिस आयुक्त डॅा रवींद्र कुमार सिंगल सरांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि कार्यक्षम नियोजनाने अमली पदार्थविरोधी अभियानांच्या क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण केला. ही मोहीम जरी एका आठवड्यापुरती मर्यादित होती, तरी तिचा परिणाम मनोवृत्तीत बदल, व्यसनातून मुक्त झालेली आयुष्यं, आणि नवचैतन्याने प्रेरित शहर यामध्ये दीर्घकाळ अनुभवता येईल.
ऑपरेशन थंडर २०२५मुळे नागपूरमध्ये व्यसनमुक्तीसाठी भक्कम पायाभरणी झाली आहे. आता ही चळवळ नियमित जनजागृती, शैक्षणिक संस्थांशी भागीदारी, समाजघटक आधारित पुनर्वसन, आ आणि कठोर अंमलबजावणीद्वारे पुढे नेणे गरजेचे आहे. नागपूर हे देशातील इतर शहरांसाठी दीर्घकालीन व्यसनमुक्तीचा आदर्श ठरू शकते.
विशेष – सदर लेखाचे लेखक हे IPS अधिकारी निकेतन ब. कदम हे असुन ते पोलिस उपायुक्त परीमंडळ ५, नागपूर शहर येथे कार्यरत आहेत



